राज्य सरकार ST बससेवा बंद करण्याच्या तयारीत

 

ताजी बातमी - राज्यात कोविड 19 संसर्गाची दुसरी लाट रोखण्यासाठी सरकारने कडक निर्बंध लावत मिनी लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र कोरोना संसर्ग पसरण्याचा वेग मोठा असल्याने सरकार आणखी कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवरच राज्य सरकारकडून एसटी बस सेवेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो.

 


< >< >


< >


< >


आंतरराज्यीय एसटी वाहतूक बंद करण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा या राज्यांत आंतरराज्य एसटीची प्रवास वाहतूक सुरू आहे. त्यापैकी मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातील एसटी वाहतूक आधीच बंद केली आहे.

 
त्यामुळे आता राज्य सरकारही इतर राज्यातील एसटी प्रवास वाहतूक बंद करून कोविड <

19 संसर्ग रोखण्यासाठीचा निर्णय लवकरच जाहीर करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


दरम्यान, याबाबतच्या कोणत्याही निर्णयाची राज्य सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र लवकरच अशी घोषणा होण्याची शक्यता आहे.


< >
Post a Comment

0 Comments