रेतीघाट सूरू झाल्याने बांधकामांना मिळाली गती पण..

रेतीघाट सूरू झाल्याने बांधकामांना मिळाली गती पण..< >


< >

गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-

पडक्या झोपडीत किंवा किरायाच्या घरात राहणार्‍या अनेक गोरगरीब कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळत आहे. याच श्रेणीत वर्ष २०१९ मध्ये इतरांबरोबर गडचांदूर येथील गोपाल ले-आऊट मधील काही रहिवाशांनाही सदर योजनेतुन घरकुल मंजूर झाले.< >

बांधकामाच्या सुरूवातीला पहिली किस्त लगेच मिळाली.नंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसरी किस्त उशिरा का होईना पण मिळाली.मध्यंतरीच्या काळात शासनाने घाटातून रेती उपसावर बंदी घातल्याने रेती तस्करी जोरात सुरू होती. दरही गगनाला भिडले होते. रात्रंदिवस मोठ्याप्रमाणात काळाबाजार सुरू असल्याने शासनाने निर्धारित केलेली घरकुलाची रक्कम अपुरी पडत होती. उसनवारी करून कसेबसे बांधकाम पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू होती.दरम्यान शासनाने रेती घाटाचे लिलाव केले. पुर्वी तीनपट दराने महागडी रेती खरेदी कराचे मात्र हल्ली रेती घाट लिलाव झाल्याने घरकुल धारकांना मोठा दिलासा मिळाला असून रेती स्वस्त व वाजवी दरात उपलब्ध होत आहे.यामुळे घरांचे अपुरे काम पूर्ण करण्याची इच्छा जागृत झाली असून उर्वरित तीसरी किस्त शासनाने लवकरात लवकर संबंधितांच्या बॅंक खात्यात जमा करावी अशी मागणी घरकुल धारकांनी  प्रशासनाकडै केली आहे. एकुणच शासनाने रेती घाटाचे लिलाव केल्याने घरकुल धारक उत्साही असून याचबरोबर सर्वप्रकारच्या लहानमोठ्या बांधकामाला गती मिळाल्याचे चित्र येत आहे.< >

Post a Comment

0 Comments