नको जाऊ रमा...या अल्बम चे डॉ बाबासाहेब आंबेडकर चे जयंती दिनी विमोचन.*🔹


 🔹 *नको जाऊ रमा...या अल्बम चे डॉ बाबासाहेब आंबेडकर चे जयंती दिनी विमोचन.*🔹


        दि 14 एप्रिल 2021 ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 130 व्या जयंती दिनी महाराष्ट्र चे सुप्रसिद्ध कवी आणि गायक तथा भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर शहर शाखेचे सरचिटणीस आद किशोरभाऊ तेलतुंबडे साहेब यांच्या सुंदर कल्पनेतून आणि महाराष्ट्रची गायन कोकिळा सुषमादेवी, मुंबई यांनी गायलेली व सध्या महाराष्ट्र मंध्ये गाजत असलेली *नको जाऊ रमा...* या संगीतमय अल्बम चे विमोचन (उदघाटन) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळा,मेन रोड चंद्रपूर येथे सकाळी 10.30 वाजता आद नेताजी भरणे,जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा पश्चिम विभाग यांनी उदघाटन केले. आणि या प्रसंगी शुभेच्या दिल्यात.या नंतर आयु.नि. किरणताई तेलतुंबडे आणि आयु.नि. सुजाता लाटकर केंद्रीय शिक्षिका यांनी अल्बम मधील गीत सादर केले.      भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल चंद्रपूर च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांना त्याचे 130 व्या जयंती दिनी अभिवादन करण्याकरिता सर्व पदाधिकारी उपस्थित झालेले होते.


प्रथमता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला पुस्पहार अर्पण करून त्रिशरन पंचशील,भीमस्मरण भीमस्तुती घेण्यात आली.आणि या नंतर समता सैनिक दल यांनी व उपस्थितांनी मानवंदना दिली.

या प्रसंगी आद किशोरभाऊ तेलतुंबडे, आयु.नि. किरणताई तेलतुंबडे, आद अशोक पेरकावार मेजर,आद प्रफुल भगत डिव्हीजण ऑफिसर,आद गुरुबालक मेश्राम डिव्हीजण ऑफिसर,आद संदीप सोनोने जिल्हा उपाध्यक्ष,आद भीमलाल साव माजी जिल्हाध्यक्ष,आयु.नि सुजाता लाटकर जिल्हा उपाध्यक्षा(महिला विभाग),केंद्रिय शिक्षिका,आद नामदेव आवळेकोषाध्यक्ष,आद कृष्णाक पेरकावार जिल्हा सचिव,आयु.जास्वंती ताई माऊलीकर केंद्रीय शिक्षिका,आयु.नि. लताताई साव केंद्रीय शिक्षिका,आद जगदीश आघात,आद संकेत जयकर,आद भाऊराव दुर्योधन ,आद आनंद कवाडे,आयु.नि.कविता अलोने ,आयु बंडू वाकडे,आद दिगंबर दुर्योधन,आद प्रकाश तावाडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments