निलजई खाणीतील कोळसा अफरातफरी प्रकरणाची सखोल चौकशी करा !

 निलजई खाणीतील कोळसा अफरातफरी प्रकरणाची सखोल चौकशी करा !

शहजाद शेख व कुबेर वर्मा यांना अटक करा !

 

पत्रकार संघाची यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी !

चंद्रपूर : १८ मार्च रोजी निलजई खाणीतून बुटीबोरी येथील प्राइड मेटल इंडस्ट्रीज येथे जाणारा सबसिडी घ्या कोळश्याचे तीन ट्रक वणी येथील एका टालावर अवैधरित्या रिकामे होताना वणी पोलिसांनी कारवाई केली. यावेळी सात आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. त्यातील वंदना ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक कुबेर वर्मा व प्राइड मेटल इंडस्ट्रीज चे शहजाद शेख यांना शोधण्यात पोलिसांना अद्याप यश मिळाले नाही. महत्वाचे म्हणजे प्राइड मेटल इंडस्ट्रीजचे संचालक शहजाद शेख व ट्रान्सपोर्ट धारक कुबेर वर्मा यांना पकडण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. सबसिडीवर लघू व मध्यम उद्योगांना मिळणाऱ्या कोळशाची खुल्या बाजारात मोठ्या दराने विक्री केली जाते. वणी येथे पकडण्यात आलेले हे तीन ट्रक अवैधरित्या कोळसा खाली करीत होते. राष्ट्रीय संपत्तीची मोठ्या प्रमाणात लुट या कोळसा अफरातफरीच्या माध्यमातून होत आहे. या कोळसा चोरी प्रकरणात अनेक मोठे मासे गुंतले असून त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. निलेशई खाणीतील कोळसा अफरातफर प्रकरणी प्राइड मेटल इंडस्ट्रीज येथे जाणारा कोळसा वणी येथील एका टालावर अवैधरित्या उतरविण्यात येत होता. महत्त्वाचे म्हणजे फेब्रुवारी 2020 ला चंद्रपूर येथील नागाडा च्या टालावर अशाच पद्धतीने कोळसा रिकामा होता नां? चंद्रपूर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यावेळी कैलास अग्रवाल सह शहजाद शेख हे आरोपी होते. त्यावेळी शहजाद शेख यांच्या कंपनीचे नाव बदलले होते. वणी येथील कोळसा अफरातफर प्रकरणी शहजाद शेख फरार असून कोळसा आता फोर प्रकरणात एक मोठे रॅकेट सक्रिय असून त्याची सखोल चौकशी यवतमाळ जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षकांनी करावी, अश्या मागणीचे पत्र पत्रकार संघांनी पोलिस अधिक्षकांना दिले आहे.

वणी पोलिसांचे पत्रकारांना असहयोगाचे धोरण !

वनी पोलिसांनी केलेल्या कोळसा अफरातफर प्रकरणी केलेली कारवाई प्रशंसनिय आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकारांनी सदर प्रकरण वृतांच्या माध्यमातून लावून धरले आहे. वनी येथील कोळसा अफरातफरी चे तार चंद्रपूर जिल्ह्याची जोडले असून यापूर्वी चंद्रपूर आतही कोळसा अफरातफरी चे मोठे रॅकेट चंद्रपुरातील पत्रकारांनी उघडकीस आणले होते. निलेजई खाणीतील कोळसा अफरातफर प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकारांना माहिती देण्यात बनी पोलीसांची असहयोगाची भावना संशय निर्माण करणारी आहे. राष्ट्रीय संपत्तीची होणारी हानी टाळावी या उद्देशाने चंद्रपुरातील पत्रकार कोळसा तस्करीच्या हेराफेरी बातम्यांच्या माध्यमातून वणी पोलिसांना सहयोग करण्याच्या प्रयत्नात आहे. तपासाला योग्य दिशा देण्याचे कार्य चंद्रपूर चे पत्रकार करीत आहेत, परंतु चंद्रपूरच्या पत्रकारांना माहिती देण्यास वणी पोलिसांची होणारी टाळाटाळ चिंतेची बाब आहे.

 

 

Post a Comment

0 Comments