पैश्याचा पाऊस पडणार असे सांगत युवतीसोबत अघोरी कृत्य, रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पैश्याचा पाऊस पडणार असे सांगत युवतीसोबत अघोरी कृत्य, रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

< >

वर्धा - कुमारिका मुलीला सोबत नेत भोंदूबाबाच्या मदतीने पैशाचा पाऊस पडण्याचा अघोरी प्रकार वर्ध्यात घडला. या प्रकरणी रामनगर पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीच्या काकासह अन्य एकाला अटक करण्यात आली आहे.

पीडित मुलगी शिक्षणासाठी वर्ध्यात राहत होती. या मुलीला सोबत घेत तिची आई, काका आणि अन्याय एक आरोपी पैशाचा पाऊस पाडण्याचे कारण सांगून हिंगणघाट तालुक्यातील येरणगाव येथे नेत होते. या प्रकाराला कंटाळून मुलगी घर सोडून पळाली होती.

पोलिसांनी या मुलीचा शोध घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

यावरून पोलिसांनी अंधश्रद्धा प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून मुलीच्या काकासह प्रवीण नामक व्यक्तीला अटक केली.

< >

यातील मुख्य आरोपी असलेल्या भोंदूबाबाच्या शोधात पोलिस पथक रवाना झाल्याची माहिती रामनगर पोलिसांनी दिली. पैशाच्या कामाकरिता मांत्रिक आणि इतर दोघांनी या मुलीला अनेक ठिकाणी नेल्याची माहिती तिने पोलिस प्रशासनाला दिली

Post a Comment

0 Comments