दुकाने बंद केल्याने "कोरोना" जाणार का ?, गडचांदुरातील व्यापाऱ्यांचे असहकार्य आंदोलन

दुकाने बंद केल्याने "कोरोना" जाणार का ?, गडचांदुरातील व्यापाऱ्यांचे असहकार्य आंदोलन< >


गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-< >
कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढत असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणात वाढ होत असल्याचे पाहून राज्य शासनाने पुन्हा एकदा ६ ते ३० एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे.यामुळे अख्खया व्यापारी वर्गात संतापाची लाट पसरली आहे.राज्यात अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी आंदोलन सुरू केले असून याच पार्श्वभूमीवर गडचांदूर शहरातील व्यापारी असोसिएशनच्या व्यापाऱ्यांनी छोटेखानी सभा घेऊन शासनाने लादलेल्या लॉकडाऊनचा जाहीरपणे निषेध केला आहे.राज्य शासनाने पूर्णवेळ बंदचा आग्रह न धरता काही तास तरी व्यापाऱ्यांना दुकाने खुली करण्याची परवानगी द्यावी.< >
"दुकाने बंद ठेवल्याने "कोरोना" जाणार का ? असा प्रश्न व्यापारी असोसिएशन अध्यक्ष हंसराज चौधरी यांनी उपस्थित केला आहे.आम्ही दुकाने खुली करू,गुन्हा दाखल झाला तरी चालेल, यासाठी तयार आहो पण आम्ही दुकाने बंद करणार नाही.अशी भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.यानंतर शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने उघडण्यास सुरवात केल्याचे पहायला मिळाले. यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हंसराज चौधरी,हेमंत वैरागडे,धनंजय छाजेड,हाजी जुबेर,काशीनाथ चुने,पंकज वैद्य,इशांत चौधरी,दिनेश पत्तीवार यांच्यासह इत्यादी पदाधिकारी,कार्यकर्ते व लहानमोठे व्यापाऱ्यांची उपस्थिती होती. जोरदार नारेबाजी करून शासनाने लावलेल्या लॉकडाऊनचा निषेध करण्यात आला. आता शासन व्यापाऱ्यांची मागणी पुर्ण करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.< >

Post a Comment

0 Comments