शरद पवारांनी घेतला कोविड-१९ लसीचा दुसरा डोस

 मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी कोविड-१९ (COVID-19)  लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी वैद्यकीय पथकाचे आभार मानले. आज सकाळी कोविड-१९ लसीचा दुसरा डोस घेतला असे ट्वीट शरद पवार यांनी केले.

डॉ. तात्याराव लहाने (Dr.Tatyarao Lahane) आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसेच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रद्धा मोरे यांचे मनापासून आभार असेही ते ट्वीटमध्ये पुढे म्हणाले. 

योगायोगाने आज जागतिक आरोग्य दिन आहे. या निमित्ताने आपणही कोविड लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले.

आज सकाळी कोविड-१९ लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. डॉ. लहाने व त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसेच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रीमती श्रद्धा मोरे यांचे मनापासून आभार!

आज सकाळी कोविड-१९ लसीचा दुसरा डोस घेतला असे ट्वीट शरद पवार यांनी केले.

डॉ. तात्याराव लहाने (Dr.Tatyarao Lahane) आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसेच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रद्धा मोरे यांचे मनापासून आभार असेही ते ट्वीटमध्ये पुढे म्हणाले. 

योगायोगाने आज जागतिक आरोग्य दिन आहे. या निमित्ताने आपणही कोविड लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले.Post a Comment

0 Comments