जागतिक आरोग्यदिनी चंद्रपुरात नवीन लसीकरण केंद्राची सुरुवात, महापौरांच्या हस्ते उदघाटन

 जागतिक आरोग्यदिनी चंद्रपुरात नवीन लसीकरण केंद्राची सुरुवात, महापौरांच्या हस्ते उदघाटनचंद्रपूर - जागतिक आरोग्यदिनाच्या अनुषंगाने मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते नवीन लसीकरण केंद्राची सुरुवात वडगाव प्रभागातील गजानन मंदिर येथे आज दि.७ एप्रिल रोजी सकाळी < >11 वाजता करण्यात आली. लसीकरण मोहीमेस गती यावी या दृष्टीने शहराच्या विविध प्रभागात लसीकरण केंद्रे चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सुरु करण्यात येत आहे.< >

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ५ एप्रिल रोजी मनपा सभागृहात आढावा बैठक घेण्यात येऊन लसीकरण केंद्रे लवकरात लवकर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज वडगाव प्रभागातील लसीकरण केंद्राचेची सुरवात करण्यात आली. याप्रसंगी उपस्थीत होते < >

शासकीय व खाजगी लसीकरण केंद्रे मिळून एकूण २८,२६९ नागरीकांचे लसीकरण चंद्रपूर शहरात आजपावेतो करण्यात आले आहे. शहरात १६ जानेवारीपासून सात केंद्रांवर दररोज ७०० जणांचे लसीकरण करण्याचे नियोजन चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने केले होते. त्यानंतर एक एक केंद्रांची वाढ करून एकूण १४ केंद्रांद्वारे १४०० लसीकरण दरदिवशी केले जाणार आहे. जसजशी केंद्रे वाढतील त्यानुसार लसीकरणास गती मिळणार आहे.

मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर श्री. राहुल पावडे, स्थायी समिती सभापती श्री. रवी आसवानी, आयुक्त श्री. राजेश मोहीते यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त श्री. विशाल वाघ यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात मुख्य वैद्यकीय अधिकारी श्री. आविष्कार खंडारे लसीकरण मोहिमेस गतिमान करण्यास प्रयत्नरत आहेत.

 

शासकीय लसीकरण केंद्रे -

सध्या रामचंद्र प्रायमरी शाळा - रामनगर, रवींद्रनाथ टागोर शाळा - विठ्ठल मंदिर वॉर्ड, मातोश्री शाळा - तुकूम, पोलीस हॉस्पिटल, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र.१ -इंदिरा नगर मूल रोड, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र.५ - नेताजी चौक बाबुपेठ, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र.६ - सुपरमार्केट भिवापुर,गजानन मंदीर वडगाव या ८ ठिकाणी शासकीय लसीकरण केंद्रे आहेत.

 

खाजगी लसीकरण केंद्रे -

संजीवनी हॉस्पीटल, क्राईस्ट हॉस्पीटल< >, बुक्कावार हॉस्पीटल, वासाडे हॉस्पीटल, मुसळे हॉस्पीटल, मानवटकर हॉस्पीटल या ६ ठिकाणी खाजगी लसीकरण केंद्रे सुरु आहेत.

 

नवीन सुरु होणारी शासकीय लसीकरण केंद्रे -

डॉ. राजेंद्र प्रसाद प्राथमिक शाळा - भानापेठ, नागरी उपजीविका अभियान - जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मागे हॉस्पिटल वॉर्ड, मुरलीधर बगळा कॉन्व्हेंट महाकाली वॉर्ड, बजाज तंत्रनिकेतन महाविद्यालय - एकोरी वॉर्ड, बॅरीस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह - समता चौक बाबुपेठ, कर्मवीर कन्नमवार प्रा. शाळा - सरकार नगर, पोद्दार कॉन्व्हेंट स्कूल - अष्टभुजा वॉर्ड रमानगर

Post a Comment

0 Comments