चंद्रपूर ब्रेकिंग : आज 178 नवे बाधित - एकूण रुग्णसंख्या 2074 : कडक लॉकडाऊन होणार #lockdown


 चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 2074 झाली आहे. गेल्या 24 तासात 178 नवीन बाधित पुढे आले आहेत .जिल्ह्यात आत्तापर्यंत 1176 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.




कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 873 बाधित उपचार घेत आहे.





आतापर्यंत 1176 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 19 सह एकूण 22 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दरम्यान ही वाढती रुग्णसंख्या पाहता सर्वांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे , सुरक्षा बाळगावी आणि आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे






जिल्ह्यात रोज कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, दिवसेंदिवस 100 च्या जवळपास कोरोनाबाधित जिल्ह्यात आढळून येत असल्याने समोरचा काळ हा चंद्रपूर करांसाठी बिकट असणार याकरिता चंद्रपुरात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करावेच लागेल अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.







चंद्रपूर शहरात 500 च्या वर कोरोनाबाधितांचा आकडा गेला आहे, त्याकरिता सोमवारपासून चंद्रपूर शहरात कडक लॉकडाऊन आज अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जाहीर करू. हा लॉकडाऊन 8 ते 10 दिवसांचा असेल.






Post a Comment

0 Comments