जिल्ह्यातील बाधितांची संख्या पोहचली 1571 वर

 25 ऑगस्ट 2020 चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात नव्या 76 बाधितांची नोंद जिल्ह्यातील बाधितांची संख्या पोहचली 1571 वर 1037 कोरोनातून बरे ; 516 वर उपचार सुरु 


दि .25 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1571 वर पोहोचली आहे . यापैकी , उपचाराअंती 1037 कोरोना बाधित बरे झालेले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे . तर सध्या उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 516 आहे . गेल्या 24 तासांमध्ये नवे 76 बाधित पुढे आलेले आहेत . जिल्ह्यात 72 वर्षीय पठाणपुरा वार्ड येथील पुरूषाचा मृत्यू झालेला आहे . बाधित कोरोना व्यतिरिक्त इतर आजाराने ग्रस्त होता . श्वसनाचा आजार तसेच न्यूमोनिया असल्याची माहिती प्राप्त झाली असून उपचारादरम्यान आज 25 ऑग .
 ला सकाळी 8.05 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे त्यांचा मृत्यू झाला .

Post a Comment

0 Comments