कृषी मंत्री दादाजी भुसे उद्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर



शेतकऱ्यांमध्ये कृषी योजनाची प्रचार प्रसिद्धी व जनजागृतीसाठी 1 जुलै ते 7 जुलै कृषी संजीवनी सप्ताह सुरु आहे. यामध्ये सर्व कृषी व कृषी संलग्न विभागाच्या सहकार्याने त्या -त्या विभागाच्या योजनांची प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत आहे.





खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच प्रगतिशील शेतकऱ्यांशी कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त संवाद साधण्यासाठी राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत.



या कृषी संजीवनी सप्ताहानिमित्य कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे शनिवारी दिनांक 4 व रविवार दिनांक 5 जूलैला चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे. 4 जूलै रोजी सकाळी 8 ते 10  वाजेपर्यंत जिल्हा भंडारा येथे असणार आहेत.सकाळी 10 वाजता निलज जिल्हा भंडारा येथून नवखळा तालुका नागभीड येथे प्रयाण करतील.




सकाळी 10:30 वाजता नवखळा तालुका नागभीड येथे सोमेश्वर विठोबा देव्हारे या शेतकऱ्यांच्या पेरू प्रकल्पास भेट व कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांची संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता सायगाटा तालुका ब्रह्मपुरी येथील शिवदास दादाजी कोरे (कृषिभूषण) यांची सेंद्रिय शेती व भाजीपाला लागवड प्रक्षेत्रास भेट देवून कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांशी संवाद साधतील.



सकाळी 11:30 वाजता सायगाटा तालुका ब्रम्हपुरी येथून नैनपुर तालुका वडसा जिल्हा गडचिरोली कडे प्रयाण करतील. दुपारी 3 वाजेपर्यंत गडचिरोली येथे असणार आहेत. दुपारी 3 वाजता गडचिरोली येथून हिरापूर जिल्हा चंद्रपूर कडे प्रयाण करतील. दुपारी 3:30 वाजता हिरापूर येथे महिला शेतीशाळा, कृषी संजीवनी सप्ताह निमित्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दुपारी 4:30 वाजता हिरापूर येथून मुल कडे प्रयाण करतील.दुपारी 4:45 वाजता मुल येथे हिमालय अॅग्रो फ्रुड्स कंपनीची पाहणी करतील.



तसेच पेरीव पद्धतीने धान लागवड व कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांशी संवाद साधतील.सायंकाळी 5:20 वाजता मुल येथून चिचपल्ली कडे प्रयाण करतील.सायंकाळी 5:25 वाजता चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रास भेट देतील. सायंकाळी 6:30 वाजता ‌चिचपल्ली येथून शासकीय विश्रामगृह चंद्रपूर कडे प्रयाण करतील.रात्री शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे मुक्काम असणार आहे.








रविवार दिनांक 5 जुलै रोजी सकाळी 8 वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथून नंदगूर तालुका चंद्रपूर कडे प्रयाण करतील. 8:30 वाजता नंदगूर येथे भाविक कन्नाके यांचे भात शेतीतील मत्स्यपालन व भाजीपाला लागवड पाहणी व कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त शेतकरी संवाद असणार आहे.


सकाळी  9:15 वाजता नंदगूर येथून हटवंजरी तालुका वणी जिल्हा यवतमाळ कडे प्रयाण करतील. रविवारी दिवसभर यवतमाळ जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. तर सोमवार दिनांक 6 जुलै रोजी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत

Post a Comment

0 Comments