गडचिरोलीत प्रवेशबंदी केल्याने सीमावर्ती शेतकऱ्यांचा चक्काजाम ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना थेट गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश नाकारला

गडचिरोलीत प्रवेशबंदी केल्याने सीमावर्ती शेतकऱ्यांचा चक्काजाम ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना थेट गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश नाकारला . त्यामुळे सात गावातील संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी वैनगंगा नदी पुलावर ब्रह्मपुरी - वडसा मार्गावर दीडतास चक्का जाम आंदोलन केले .





ठळक मुद्दे

प्रवेशबंदी हटवा आश्वासनानंतर केला मार्ग मोकळा sabmera.co.in न्यूज नेटवर्क


चंद्रपूर : ब्रह्मपुरी शहरात कोरोनाचा रूग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना थेट गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश नाकारला .



 त्यामुळे सात गावातील संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी वैनगंगा नदी पुलावर ब्रह्मपुरी - वडसा मार्गावर दीडतास चक्का जाम आंदोलन केले . या आंदोलनामुळे शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या . ब्रह्मपुरी तालुक्यातील शेकडो शेतकरी दूध , दही , भाजीपाला विक्री व जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा शहरात दररोज ये - जा करतात .


  वडसा शहरात प्रवेश करतात . मात्र , ब्रह्मपुरीत कोरोना रूग्ण आढळताच गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वैनगंगा नदीपूल ओलांडून ८ किमी अंतरावरील वडसा शहरात प्रवेशबंदी लादली . परिणामी ब्रम्हपुरी तालुक्यातील हरदोली , चिंचोली , चिखलगाव , लाडज , सोंद्री , सोनेगाव , सावलगाव येथील शेतकऱ्यांना दूध , दही , भाजीपाला व अन्य शेतमाल वडसा शहरात विकण्याचा मार्ग बंद झाला .



संतापलेल्या शेतकऱ्यांनी वैनगंगा पुलावर झाडे , लाकूड व दगड टाकून चक्काजाम आंदोलन सुरू केले . यानंतर वडसा तहसीलदार , मुख्याधिकारी , ब्रह्मपुरी तहसीलदार विजय पवार , वडसा व ब्रम्हपुरी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला . अधिकाऱ्यांनी वरिष्ठांची चर्चा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन देताच मार्ग मोकळा केला .



सात गावांमध्ये कोरोनाचा रूग्णच नसताना बंदी का ? वैनगंगा नदीकिनारी वसलेल्या ब्रह्मपुरी तालुक्यातील सात गावांची नाळ गडचिरोली जिल्ह्यातील वडसा शहराशी जोडली आहे . या शहरातील बाजारपेठेत दररोज शेकडो नागरिकांची ये - जा सुरू असते . हरदोली , चिंचोली , चिखलगाव , लाडज , सोंद्री , सोनेगाव , सावलगाव येथे कोरोनाचा एकही रूग्ण आढळला नाही . त्यामुळे गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट प्रवेशना कारणे अन्यायकारक आहे ,

अर्श नाराजी शेतकऱ्यांनी सबमेराजवळ व्यक्त केली . Sabmera.Co.in

Post a Comment

0 Comments