रिपब्लिकन स्टुंडट फेडरेशन च्या प्रयत्नाला यश —वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकल्या*
*रिपब्लिकन स्टुंडट फेडरेशन च्या प्रयत्नाला यश —                     वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकल्या*
भारतातच नसून संपूर्ण जगात करोनाचा संसर्ग खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या उन्हाळी-२०२० च्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या आणि आता वैद्यकीय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने ३ ऑगस्ट पासून परीक्षा पूर्ण आयोजिय करण्याचे वेळापत्रक विविध विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले होते.

कोरोनाचा प्रादूर्भावापासून सर्वत्र जनमानसात भीतीचे वातावरण असताना विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा देणे हे कितपत सुरक्षित आहे यात आम्हाला शंका आहे म्हणून रिपब्लिकन स्टुडेंट फेडरेशन, वतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण विभागाचे परीक्षा प्रमुख डाॅ. अजित पाथक यांना  जिल्हाअधिकारी यांच्या मार्फत राजस खोब्रागडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले होते.


                डाॅ. अजित पाथक यांनी रिपब्लिकन स्टुंडट फेडरेशन व इतर सर्व विदयार्थ्यांचा विचार करुन परिक्षा समोर ढ़कलण्यात आले असे पत्रक जाहीर केलेले आहे.
  *डाॅ. अजित पाथक ह्यांचे सर्व विद्यार्थ्यांकडून मनपूर्वक आभार! *
तसेच हे यश सर्व विदयार्थ्यांच आहें व असच आपण सर्व आपल्या हक्कासाठी लढत राहु हीच अपेक्षा!

Post a Comment

0 Comments