चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 309

* Update @ 309 २१ जुलै २०२० संध्याकाळी ७.०० वाजता * * चंद्रपूर कोरोना अपडेट * जिल्हा माहिती कार्यालय , चंद्रपूर * चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ३० ९ सध्या १२५ बाधितांवर उपचार सुरु आहेत १८४ पॉझिटिव्ह कोरोना आजारातून बरे जिवती तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव चंद्रपूर दि . २१ जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ३० ९ वर पोहोचली आहे . मंगळवारी चार बाधितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . जिल्ह्यामध्ये वैद्यकीय अहवालात स्पष्ट झालेल्या ३० ९ बाधितापैकी ६४ बाधित हे जिल्ह्या व राज्याबाहेरील आहेत . तसेच यातील चार बाधित अँटीजेन चाचणीतून पुढे आले आहे . आतापर्यंत जिल्ह्यामध्ये १३ हजार ३७२ नमुने तपासण्यात आले आहे यापैकी १२ हजार २८६ नमुने निगेटिव्ह आले आहेत 747 नमुने प्रतीक्षेत आहेत .


जिल्ह्यातील 184 पॉझिटिव्ह कोरोना आजारातून बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे . सध्या 125 बाधितांवर उपचार सुरु आहेत उपचार सुरु आहत . मंगळवारच्या चार बाधितांमध्ये जीवती तालुक्यातील टेकामांडवा येथील 18 वर्षीय महिलेचा समावेश आहे नांदेड शहरातून प्रवास केल्याची त्यांची नोंद आहे ज्योती तालुक्यातील ही पहिली नोंद आहे .ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी येथील रहिवासी असणाऱ्या 28 वर्षाच्या युवकांचा समावेश आहे . तामिळनाडू राज्यातून 18 जुलै रोजी परत आलेल्या या युवकाला आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते . 20 जुलै रोजी त्यांचा स्वब घेण्यात आला . आज अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .ब्रह्मपुरी तालुक्यातील रानबोथली या गावातील आणखी दोन जवळच्या संपर्कातील २२ वर्षीय व ५५ वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरल्या आहेत . यापूर्वी याच कुटुंबातील एक पुरुष पॉझिटिव्ह जाहीर करण्यात आला होता . २० जुलै रोजी त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता .

 जिल्हयातील आतापर्यंतचे कोरोना बाधितांचे विवरण : चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ) , 13 मे ( एक बाधित ) , 20 मे ( एकूण 10 बाधित ) , 23 मे ( एकूण 7 बाधित ) , 24 मे ( एकूण 2 बाधित ) , 25 मे ( एक बाधित ) , 31 मे ( एक बाधित ) , 2 जून ( एक बाधित ) , 4 जून ( दोन बाधित ) , 5 जून ( एक बाधित ) , 6 जून ( एक बाधित ) , 7 जून ( 11 बाधित ) , 9 जून ( एकुण 3 बाधित ) , 10 जून ( एक बाधित ) , 13 जून ( एक बाधित ) , 14 जून ( एकुण तीन बाधित ) , 15 जून ( एक बाधित ) , 16 जून ( एकुण 5 बाधित ) , 17 जून ( एक बाधित ) , 18 जून ( एक बाधित ) , 21 जून ( एक बाधित ) , 22 जून ( एक बाधित ) , 23 जून( एकूण बाधित चार ) , 24 जून ( एक बाधित ) , 25 जून ( एकूण 10 बाधित ) , 26 जून ( एकूण दोन बाधित ) , 27 जून ( एकूण 7 बाधित ) , 28 जून ( एकूण 6 बाधित ) , 29 जून ( एकूण 8 बाधित ) , 30 जून ( एक बाधित ) , 1 जूलै ( एकूण दोन बाधित ) , 2 जुलै ( 4 बाधित ) , 3 जुलै ( एकूण 11 बाधित ) , 4 जुलै ( एकूण 5 बाधित ) , 5 जुलै ( एकूण 3 बाधित ) , 6 जुलै ( एकूण सात बाधित ) , 8 जुलै ( एकूण पाच बाधित ) , 9 जुलै ( एकूण 14 बाधित ) , 10 जुलै ( एकूण 12 बाधित ) , 11 जुलै ( एकूण 7 बाधित ) , 12 जुलै ( एकूण 18 बाधित ) , 13 जुलै ( एकूण 11 बाधित ) , 14 जुलै ( एकूण 10 बाधित ) , 15 जुलै ( एकूण 5 बाधित ) , 16 जुलै ( एकूण 5 बाधित ) 17 जुलै ( एकूण 25 बाधित ) १८ जुलै ( एकूण १७ बाधित ) १ ९ जुलै ( एकूण बाधित १६ ) २० जुलै ( एकूण बाधित २ ९ ) व २१ जुलै ( एकूण ३ ) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित ३० ९ झाले आहेत .

आतापर्यंत १८४ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे . त्यामुळे ३०८ पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता १२५ झाली आहे . सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत

<

Post a Comment

0 Comments