चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 294

* २० जुलै २०२० संध्याकाळी ६ वाजता * * चंद्रपूर कोरोना अपडेट * जिल्हा माहिती कार्यालय , चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या २ ९ ४ मूल येथील राईस मीलमधील आतापर्यंत २४ कामगार पॉझिटीव्ह उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या १३१ १६३ बाधित कोरोनातून बरे चंद्रपूर , दि . २० जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हमध्ये सोमवारी १८ बाधिताची भर पडली आहे .
जिल्ह्यात सध्या २ ९ ४ बाधितांपैकी १६३ बाधिताना कोरोनातून बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे . तर १३१ जणांवर उपचार सुरू आहे . जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये ४८ बाधित हे परराज्यातील व परजिल्ह्यातील आहेत .
या बाधितामध्ये ३ जण अॅन्टीजेन चाचणीतून बाधित म्हणून पुढे आले आहेत . आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये मुल येथील राईस मिल मध्ये काम करणाऱ्या १२ कामगारांचा समावेश आहे . १२ जुलै रोजी बिहार राज्यातून कामगारांची एक चमू मूल येथे आली होती . यापूर्वी १२ कामगार पॉझिटीव्ह ठरले होते .
आजच्या १२ कामगारांमुळे एकूण २४ कामगार पॉझिटिव्ह झाले आहेत . चंद्रपूर महानगरातील यापूर्वी पॉझिटिव आलेल्या जैन मंदिर तुकुम परिसरातील एका बाधितांचे दहा व पंधरा वर्षीय मुले चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत .मुल येथील रहिवासी असणाऱ्या 30 वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .

भुसावळ येथून प्रवासाची त्यांची नोंद आहे . कोरपना तालुक्यातील उपरवाही या प्रतिबंधात्मक क्षेत्रातील गावातील ताप सदृश्य आजाराने ग्रस्त असणारा 36 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह ठरला आहे . सोबतच ब्रह्मपुरी तालुक्यातील दोन जण पॉझिटिव्ह ठरले आहे .


यामध्ये हैदराबाद येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या ब्रह्मपुरी तालुक्यातील किनी येथील 29 वर्षीय युवकाचा समावेश आहे . कुर्ला येथे संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या या युवकाचा काल स्वब घेण्यात आला होता .
br />अमरावती येथून ब्रह्मपुरी पटेल नगर येथे परतलेल्या 29 वर्षीय महिलेचा २ स्वब पॉझिटिव्ह आला आहे . 15 जुलैला अमरावती येथून परतल्यानंतर ही महिला संस्थात्मक अलगीकरणात होती .
 18 जुलैला स्वब घेण्यात आला . महिला आता पॉझिटिव्ह ठरली आहे .- जिल्हयातील आतापर्यंतचे कोरोना बाधीतांचे विवरण :
चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ) , 13 मे ( एक बाधित ) , 20 मे ( एकूण 10 बाधित ) , 23 मे ( एकूण 7 बाधित ) , 24 मे ( एकूण 2 बाधित ) , 25 मे ( एक बाधित ) , 31 मे ( एक बाधित ) , 2 जून ( एक बाधित ) , 4 जून ( दोन बाधित ) , 5 जून ( एक बाधित ) , 6 जून ( एक बाधित ) , 7 जून ( 11 बाधित ) , 9 जून ( एकुण 3 बाधित ) , 10 जून ( एक बाधित ) , 13 जून ( एक बाधित ) , 14 जून ( एकुण तीन बाधित ) , 15 जून ( एक बाधित ) , 16 जून ( एकुण 5 बाधित ) , 17 जून ( एक बाधित ) , 18 जून ( एक बाधित ) , 21 जून ( एक बाधित ) , 22 जून ( एक बाधित ) , 23 जून ( एकूण बाधित चार ) , 24 जून ( एक बाधित ) , 25 जून ( एकूण 10 बाधित ) , 26 जून ( एकूण दोन बाधित ) , 27 जून ( एकूण 7 बाधित ) , 28 जून ( एकूण 6 बाधित ) , 29 जून ( एकूण 8 बाधित ) , 30 जून ( एक बाधित ) , 1 जूलै ( एकूण दोन बाधित ) , 2 जुलै ( 4 बाधित ) , 3 जुलै ( एकूण 11 बाधित ) , 4 जुलै ( एकूण 5 बाधित ) , 5 जुलै ( एकूण 3 बाधित ) , 6 जुलै ( एकूण सात बाधित ) , 8 जुलै ( एकूण पाच बाधित ) , 9 जुलै ( एकूण 14 बाधित ) , 10 जुलै ( एकूण 12 बाधित ) , 11 जुलै ( एकूण 7 बाधित ) , 12 जुलै ( एकूण 18 बाधित ) , 13 जुलै ( एकूण 11 बाधित ) , 14 जुलै ( एकूण 10 बाधित ) , 15 जुलै ( एकूण 5 बाधित ) , 16 जुलै ( एकूण 5 बाधित ) 17 जुलै ( एकूण 25 बाधित ) १८ जुलै ( एकूण १७ बाधित ) १ ९ जुलै ( एकूण बाधित १६ ) व २० जुलै ( एकूण बाधित १८ ) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित २ ९ ४ झाले आहेत . आतापर्यत १६३ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे .

त्यामुळे २९४ पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता १३१ झाली आहे . सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत . 37

Post a Comment

0 Comments