भद्रावतीत लग्नसमारंभात उपस्थित जोडपं निघालं पॉसिटीव्ह : इतर 61 संपर्कांत आलेले वऱ्हाडी कोरेन्टाईन : 7 जुलै ते 9 जुलै पर्यन्त भद्रावती शहर बंद ! फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरु #couple-found-covid-19-positive-at-bhadrawati

भद्रावतीत लग्नसमारंभात उपस्थित जोडपं निघालं पॉसिटीव्ह : इतर 61 संपर्कांत आलेले वऱ्हाडी कोरेन्टाईन : 7 जुलै ते 9 जुलै पर्यन्त भद्रावती शहर बंद ! फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरु #couple-found-covid-19-positive-at-bhadrawati

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितची संख्या दिवसेंदिवस वाढत असून चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 123 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.


या पार्श्वभूमीवर एका लग्न समारंभात गेलेलं जोडपं हे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली, लग्न समारंभ व त्या जोडप्याच्या संपर्कात आलेले 61 नागरिकांना कोरेन्टाईन करण्यात आले आहे.हे जोडपं 5 जुले ला कोरोना पॉझिटिव्ह आढळलं होते.7 जुलै ते 9 जुलै पर्यन्त भद्रावती शहर बंद असणार आहे, या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू राहतील.


जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानातील कर्मचाऱ्यांनी नेहमी मास्कचा वापर करावा व नागरिकांनी सुद्धा मास्क व सोशल डिस्टनसिंग चा वापर करावा असे आवाहन भद्रावती नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.


आदेशाचे पालन न करणार्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.जिल्ह्यात आतापर्यत 62 कोरोनातून बरे; 61 बाधितांवर उपचार सुरू आहेत.


जिल्ह्यात एकूण संस्थात्मक अलगीकरणात 939 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 168 नागरिक,तालुकास्तरावर 368 नागरिक तर, जिल्हास्तरावर 403 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 84 हजार 955 नागरिक दाखल झाले आहेत. 82 हजार 962 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. 1 हजार 993 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.

आतापर्यंतचे कोरोना बाधीतांचे विवरण :

चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7 बाधित), 24 मे ( एकूण 2 बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण 3 बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण 5 बाधित), 17 जून ( एक बाधित), 18 जून ( एक बाधित), 21 जून (एक बाधित), 22 जून (एक बाधित), 23 जून (एकूण बाधित चार ), 24 जून (एक बाधित), 25 जून (एकूण 10 बाधित),26 जून (एकूण दोन बाधित), 27 जून (एकूण 7 बाधित), 28 जून (एकूण 6 बाधित), 29 जून (एकूण 8 बाधित), 30 जून (एक बाधित), 1 जूलै (एकूण दोन बाधित), 2 जुलै ( 2 बाधित ), 3 जुलै ( एकूण 11 बाधित ), 4 जुलै ( एकूण 5 बाधित ), 5 जुलै ( एकूण 3 ‌ बाधित ) आणि 6 जुलै ( एकूण दोन बाधित ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित 123 झाले आहेत. आतापर्यत 62 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 123  पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता 61 झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

Post a Comment

0 Comments