जिल्हाधिकारी चंद्रपूर जिल्ह्यातील बाधिताची संख्या 523 वर जिल्हाधिकारीला कार्यालयातील कर्मचारी पॉझिटीव्ह , आज शुक्रवारी एका दिवशी 281 बाधिताची नोंदजिल्हाधिकारीकार्यालयातील 70 कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतले # covid -19

जिल्हाधिकारी चंद्रपूर जिल्ह्यातील बाधिताची संख्या 523 वर जिल्हाधिकारीला कार्यालयातील कर्मचारी पॉझिटीव्ह , आज शुक्रवारी एका दिवशी 281 बाधिताची नोंदजिल्हाधिकारीकार्यालयातील 70 कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतले # covid -19






चंद्रपुर , दि . 31 जुलै :

 चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या दररोज वाढत असून आज जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन कर्मचारी देखील पॉझिटिव्ह ठरले आहेत .







 जिल्ह्यात आतापर्यंत 523 लोकांना कोरोना आजाराची लागण झाली असून 322 बाधित बरे झाले आहेत . सध्या 201 बाधितावर उपचार सुरू आहे . 







चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल 495 असणारी रुग्णसंख्या आज सायंकाळपर्यंत 523 झाली आहे.एकाच दिवशी 28 बाधित जिल्हयातून पुढे आले आहेत . 









यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन लिपिकांचा समावेश आहे . रात्री उशिरापर्यंत त्यांच्या संपर्कातील सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी सुरू होती . 






निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेआठ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील 70 कर्मचाऱ्यांचे नमुने घेण्यात आले . 





आज पुढे आलेल्या पॉझिटिव्ह नमुन्यांमध्ये ब्रह्मपुरी तालुक्यातून 3 , चिंतलधाबा पोंभुर्णा या ठिकाणावरून 2 , पोंभुर्णा शहरातून एक , भद्रावती तालुक्यातून एकूण 4 नागरिक पॉझिटिव्ह आले आहे . यामध्ये कुचना येथील 2 , एकता नगर येथील एक , भद्रावती शहरातील आणखी एक बाधिताचा समावेश आहे . 







गडचांदूर लक्ष्मी टॉकीज जवळ आणखी दोन रुग्ण पुढे आले आहेत .







 तर चंद्रपूर शहरातील शक्तिनगर व दुर्गापूर परिसरातून प्रत्येकी एक बाधित पुढे आला आहे . 








 रात्री उशिरा आणखी पुढे आलेल्या बाधितामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन , नागभीड येथील औरंगाबाद वरून आलेले एकूण पाच , व अँन्टीजेन चाचणीमध्ये पुढे आलेले एकूण सहा अशा दिवसभरातील 28 बाधितांचा समावेश आहे .





 जिल्हाधिकारी डॉ . कुणाल खेमनार यांनी तीन बाधित जिल्हाधिकारी कार्यालयात पुढे आले असल्याची पुष्टी केली असून नागरिकांनी गरज नसताना सरकारी कार्यालयांमध्ये गर्दी करू नये , असे आवाहन केले आहे . 




सर्व कर्मचाऱ्यांची , त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करण्यात येत असून सर्वांची आवश्यक ती काळजी घेतली जात असल्याचे स्पष्ट केले . 

Post a Comment

0 Comments