चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 489 झाली आहे.


गुरूवारी एक 22 बाधिताची नोंद

एका पोलिसासह 3 वर्षीय बालक सुद्धा पॉझिटिव्ह, अफगाणिस्तान मधुन आलेले व्यक्तीही पॉझिटिव्ह


चंद्रपूर दि. 30 जुलै : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 489 झाली आहे. यापैकी 311 बाधित बरे झाले आहेत तर 178 जण उपचार घेत आहेत. गुरूवारी एकूण 22 बाधित पुढे आले आहेत.चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नाही. बाधित दुरुस्त होण्याचा दर राज्यात 57.14 असताना जिल्ह्यात हा दर 64 आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 21 हजार 631 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत गेल्या चार महिन्यांमध्ये 90 हजार 282 नागरिक परत आलेले आहे. तर 60 हजारावर नागरिक जिल्ह्यातून बाहेर गेले आहेत.

आज पुढे आलेल्या एकूण 22 बाधितामध्ये सायंकाळी 4 आणखी पॉझिटीव्ह पुढे आले आहेत. या चारही नागरिकांची अँटीजेन चाचणी करण्यात आली आहे.

यामध्ये कोरपणा येथील 36 वर्षीय व्यक्तीचा समावेश असून वार्ड नंबर 3 मधील संपर्कातील हा बाधित आहे. बल्लारपूर शहरातील रेल्वे कॉलनी बायपास येथील तीन रुग्ण पुढे आले आहेत. सरासरी 40 वयोगटातील हे तीनही रुग्ण पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातून बाधित झाले आहेत.

तत्पूर्वी, सायंकाळपर्यंत 18 बाधित पुढे आले होते. यामध्ये कोरपना तालुक्यातील पालगाव येथील यापूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 34 वर्षीय पुरुष व 3 वर्षीय बालकाचा समावेश आहे.

राजुरा पोलीस स्थानकातील 46 वर्षीय जवान पॉझिटिव्ह ठरला आहे. या ठिकाणच्या यापूर्वीच्या बाधितांच्या संपर्कातील हा जवान असल्याचे समजते.

राजुरा येथील तेलंगाना राज्यातून प्रवास केलेली 19 वर्षीय युवती तपासणीअंती पॉझिटिव्ह निघाली आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील वांढरी येथील 24 वर्षीय पुरुष संपर्कातून बाधीत ठरला आहे. चेन्नई येथून याठिकाणी आलेला यापूर्वीच्या एक पॉझिटिव्हच्या हा युवक संपर्कात आहे.

नागभीड तालुक्यातील किरमिटी मेंढा येथील 21 वर्षीय युवक बाधित ठरला आहे. दिल्ली येथून आल्यानंतर हा युवक संस्थात्मक अलगीकरणात होता.

चंद्रपूर शहरातील पठाणपुरा सावरी बंगला परिसरातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 26 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह ठरला आहे.

ब्रह्मपुरी येथील कुडेसाघली 24 वर्षीय पुरुष यापूर्वीच्या एका बाधितांच्या संपर्कातून पॉझिटिव्ह ठरला आहे.

कागज नगर येथून प्रवास केला असल्याची नोंद असलेला सिंदेवाही तालुक्यातील 23 वर्षीय पुरुष पॉझिटीव्ह ठरला आहे.

अफगाणिस्तान परत आल्यानंतर श्वसनाचा आजार जाणवू लागल्यामुळे दुर्गापुर वार्ड, चंदू बाबा गेट जवळील 49 वर्षीय व 20 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.

याशिवाय नागभीड येथील वार्ड क्रमांक सहा मधील काल निघालेल्या दोन पॉझिटिव्हच्या संपर्कातील 22 व 12 वर्षीय दोन पुरुष व 20 वर्षीय महिला अँटीजेन चाचणीमध्ये पॉझिटिव्ह ठरली आहे.नागभीड येथील सिनेमा टॉकीज परिसरातील 60 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे.

राजुरा तालुक्यातील चुनाळा गावातील 42 वर्षीय पुरुष ,चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आला आहे. चिमूर तालुक्यातील ब्राह्मणी येथील 31 वर्षीय महिला व केवळ नऊ दिवसांची मुलगी अँन्टीजेन चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आली आहे.

चंद्रपूर येथील बागडे हाऊस वार्ड नंबर 16 मधील 32 वर्षीय पुरुष चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आला आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

ग्रामीण भागामध्ये तालुका चंद्रपूर-38, बल्लारपूर सहा, पोंभूर्णा पाच, सिंदेवाही 11, मुल 13, ब्रह्मपुरी 44, नागभीड 7, वरोरा 11, कोरपना 6, गोंडपिपरी तीन, राजुरा 7, चिमूर 10, भद्रावती 7, जिवती, सावली येथे प्रत्येकी 2 बाधित आहेत.

शहरी भागामध्ये बल्लारपूर 24, वरोरा 17, राजुरा 8, मुल 38, चिमूर 4, भद्रावती 34, ब्रह्मपुरी 23, कोरपना तीन, नागभिड चार तर गडचांदूर 19 बाधित आहेत.

चंद्रपूर महानगरपालिका भागामध्ये कृष्णनगर दोन, बिनबा गेट एक, बाबुपेठ 10, बालाजी वार्ड पाच, भिवापूर वार्ड दोन, शास्त्रीनगर एक, सुमित्रानगर चार, स्नेह नगर एक, लुंबीनी नगर 4, जोडदेउळ एक, तुकूम तलाव चार, दूध डेअरी तुकूम दोन, लालपेठ एक, पोलीस मंगल कार्यालय तुकूम 20, दाद महल वार्ड, शिवाजी नगर तुकुम, इंदिरानगर तुकुम, लालपेठ, भानापेठ, हवेली गार्डन,लखमापूर हनुमान मंदिर,घुटकाळा,आजाद हिंद वार्ड तुकूम,संजय नगर,कोतवाली वार्ड,एकोरी वार्ड,जैन मंदिर तुकुम,साईनगर,क्रिस्टॉल प्लाझा, रहमतनगर, हॉस्पिटल वार्ड, रामाळा तलाव, पठाणपुरा, श्यामनगर, गिरनार चौक, निर्माण नगर येथे प्रत्येकी एक बाधित आहेत. बगल खिडकी दोन, पागल बाबा नगर तीन,वडगाव दोन,सिविल लाइन्स चार,अंचलेश्वर गेट तीन, चोर खिडकी सहा,रयतवारी वार्ड पाच, जयराजनगर (दांडिया ग्राउंड) तुकूम दोन, गोपाळपुरी 6, जटपुरा वार्ड तीन, रामनगर तीन, जगन्नाथ बाबा नगर दोन असे एकूण जिल्ह्यातील बाधितांची संख्या 489 वर गेली आहे.
A


Post a Comment

0 Comments