महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवला मात्र ‘हे’ होणार सुरु
मुंबई : केंद्र सरकारने अनलॉक -3 साठी गाईडलाइंस जारी केल्या आहेत . 

गृह मंत्रालयाने जारी केलेल्या या गाईडलाइंसमध्ये कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊन राहणार असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत . 
तर , देशातील सर्वच राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशमधील प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर देशातील शाळा आणि महाविद्यालये 31 ऑगस्टपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . 
त्यानंतर , आता राज्य सरकारनेही 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे .महाराष्ट्र सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत ऑगस्ट महिन्यात काही शिथिलता दिली आहे . 
मात्र , 31 ऑगस्टपर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम असणार आहे .
 राज्य सरकारच्या नवीन गाईडलाईनुसार मॉल्स मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे .
 मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील थिएटर , फूड कोर्ट आणि रेस्तराँ सुरु ठेवण्यास मात्र परवानगी नाही . पण होमडिलिव्हरी करण्यासाठी फूड कोर्ट आणि
रेस्टॉरंट आपलं किचन सुरु ठेऊ शकतत . 

मात्र , राज्य सरकारच्या जून महिन्यातील आदेशाप्रमाणेच इतर सर्व नियम लागू असणार आहेत . सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर बंधनकारक आहेच


Post a Comment

0 Comments