चंद्रपुर जिल्ह्यात एकूण बाधित संख्या 276 वर

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हमध्ये रविवारी १६ बाधिताची भर पडली आहे . जिल्ह्यात सध्या २७६ बाधितांपैकी १५ ९ बाधिताना कोरोनातून बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे . तर ११७ जणांवर उपचार सुरू आहे . जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये ४८ बाधित हे परराज्यातील व परजिल्ह्यातील आहेत . 









या बाधितामध्ये ३ जण अॅन्टीजेन चाचणीतून बाधित म्हणून पुढे आले आहेत.आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये मुल येथील राईस मिल मध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांचा समावेश आहे . अनुक्रमे ५० व २५ वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . 





१२ जुलै रोजी बिहार राज्यातून कामगारांची एक चमू मूल येथे आली होती . 

यापूर्वी १२ कामगार व एक चालक असे एकूण १३ जण पॉझिटीव्ह ठरले होते . 





आज दोन कामगारांमुळे एकूण १४ कामगार पॉझिटिव्ह झाले आहेत . बिहार राज्यातील आणखी एक व्यवसायाने चालक असणारा ४५ वर्षीय नागरिक पॉझिटिव्ह ठरला आहे .





 १२ जुलै रोजी रेल्वेने आल्यानंतर बिहार येथूनच आलेल्या एका चालकाच्या संपर्कात आल्याने तो पॉझिटिव्ह झाला आहे






 . बिहार राज्यातील आणखी एक व्यवसायाने चालक असणारा ४५ वर्षीय नागरिक पॉझिटिव्ह ठरला आहे . 



१२ जुलै रोजी रेल्वेने आल्यानंतर बिहार येथूनच आलेल्या एका चालकाच्या
















संपर्कात आल्याने तो पॉझिटिव्ह झाला आहे . राज्य राखीव पोलीस दलाच्या कंपनीमधील आणखी तीन जवान पॉझिटिव्ह ठरले आहेत . जोखमीच्या संपर्कातील असणारे अनुक्रमे २७ , २८ व ३१ वर्षीय जवान संस्थात्मक अलगीकरणात होते .





 १६ जुलै रोजी स्वब घेण्यात आले होते . त्यामध्ये तीन जवान पॉझिटिव्ह ठरले आहे . चंद्रपूर येथे कार्यरत असलेले यापूर्वी 16 जवान पॉझिटिव्ह ठरले होते . 





आत्तापर्यंत एकूण 19 जवान पॉझिटिव्ह ठरले आहेत . राजुरा ब्राह्मणवाडा येथील 32 वर्षीय युवक हैद्राबाद वरून आला होता . 





संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या युवकाचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे . कोरपना तालुक्यातील पालगाव फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या चेन्नई वरून परत आलेला 30 वर्षीय युवकाचा स्वब पॉझिटीव्ह आला आहे . 


गडचांदूर येथील वार्ड क्रमांक चार मधील रहिवासी असणाऱ्या 37 वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . 




अमरावती वरून परत आल्यानंतर संस्थात्मक ऐवजी गृह अलगीकरणात होता . विदेशातून आलेल्या चंद्रपूर येथील गाडगेबाबा चौक बाबुपेठ परिसरातील एका युवकाचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे . विदेशातून आल्यानंतर हा युवक संस्थात्मक अलगीकरण होता .













. वरोरा येथील 70 वर्षीय पुरुष व 38 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे . मुंबई येथून आल्यानंतर दोघेही ही संस्थात्मक अलगीकरणात होते . 17 जुलै रोजी घेण्यात आलेले यांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत .



 बंगळूरवरून परत आलेला चंद्रपूर येथील 35 वर्षीय रयतवारी कॉलनी चंद्रपूर येथील नागरिक आल्यापासून संस्थात्मक अलगीकरणात होता . त्यांचा देखील नमुना पॉझिटिव्ह ठरला आहे . याशिवाय बाबुपेठ परिसरातील ५७ वर्षीय जोखमीच्या संपर्कातील नागरिकाचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे . 





चंद्रपूर जिल्ह्यातील पालगाव येथील नागरिक असणारे सैन्यदलातील जवानाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे . ११ तारखेला चेन्नई येथून आगमन झाल्यानंतर काल स्वब घेण्यात आल्यावर बाधित असल्याचे आढळून आले .



 ब्रह्मपुरी तालुक्यातील रानबोथली येथील एका परिवारातील चार वर्षीय बालिका पॉझिटिव्ह ठरली आहे . या कुटुंबातील एका व्यक्तीने मध्य प्रदेशातून प्रवास केला होता . त्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला होता . 17 ता ला नमुना घेण्यात आला होता . आज ती पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले . 







 . जिल्हयातील आतापर्यंतचे कोरोना बाधीतांचे विवरण चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ) , 13 मे ( एक बाधित ) , 20 मे ( एकूण 10 बाधित ) , 23 मे ( एकूण 7 बाधित ) , 24 मे ( एकूण 2 बाधित ) , 25 मे ( एक बाधित ) , 31 मे ( एक बाधित ) , 2 जून ( एक बाधित ) , 4 जून ( दोन बाधित ) , 5 जून ( एक बाधित ) , 6 जून ( एक बाधित ) , 7 जून ( 11 बाधित ) , 9 जून ( एकुण 3 बाधित ) , 10 जून ( एक बाधित ) , 13 जून ( एक बाधित ) , 14 जून ( एकुण तीन बाधित ) , 15 जून ( एक बाधित ) , 16 जून ( एकुण 5 बाधित ) , 17 जून ( एक बाधित ) , 18 जून ( एक बाधित ) , 21 जून ( एक बाधित ) , 22 जून ( एक बाधित ) , 23 जून ( एकूण बाधित चार ) , 24 जून ( एक बाधित ) , 25 जून ( एकूण 10 बाधित ) , 26 जून ( एकूण दोन बाधित ) , 27 जून ( एकूण 7 बाधित ) , 28 जून ( एकूण 6 बाधित ) , 29 जून ( एकूण 8 बाधित ) , 30 जून ( एक बाधित ) , 1 जूलै ( एकूण दोन बाधित ) , 2 जुलै ( 4 बाधित ) , 3 जुलै ( एकूण 11 बाधित ) , 4 जुलै ( एकूण 5 बाधित ) , 5 जुलै ( एकूण 3 बाधित ) , 6 जुलै ( एकूण सात बाधित ) , 8 जुलै ( एकूण पाच बाधित ) , 9 जुलै ( एकूण 14 बाधित ) , 10 जुलै ( एकूण 12 बाधित ) , 11 जुलै ( एकूण 7 बाधित ) , 12 जुलै ( एकूण 18 बाधित ) , 13 जुलै ( एकूण 11 बाधित ) , 14 जुलै ( एकूण 10 बाधित ) , 15 जुलै ( एकूण 5 बाधित ) , 16 जुलै ( एकूण 5 बाधित ) 17 जुलै ( एकूण 25 बाधित ) १८ जुलै ( एकूण १७ बाधित ) व १ ९ जुलै ( एकूण बाधित १६ ) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित २७६ झाले आहेत . आतापर्यत १५ ९ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे . त्यामुळे २७६ पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता ११७ झाली आहे . 








सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत .

Post a Comment

0 Comments