वेगळा विदर्भ का ? Why a different Vidarbha ?

                                               
       वेगळा विदर्भ का ?
      हा कायमच चर्चेचा विषय आहे .

काही लोकांच्या मनात याबाबत साशंका सुद्धा आहे कि जर वेगळा विदर्भ झाल्यास आपण सक्षम होऊ कि नाही . पण खालील काही बाबींवर कृपया विचार करा आणि सांगा कि फायदा कुणाचा होईल . पण कृपया वाचा एकदा तरी.छत्तीसगड हे राज्य मध्यप्रदेश पासून वेगळे झाले . आता छत्तीसगड चा विकास दर ( growth rate ) - 92 % आहे , आणि मध्यप्रदेश चा फक्त 4.2 % . झारखंड हे राज्य बिहार पासून वेगळे झाले .आता झारखंड चा विकास दर 111 % आहे , आणि बिहार चा फक्त 4.7 % उत्तराखंड हे राज्य उत्तरप्रदेश पासून वेगळे झाले . आता उत्तराखंड चा विकास दर 8.8 % आहे , आणि उत्तरप्रदेश चा 4.6 % तेलंगणा हे राज्य आंध्रप्रदेश पासून वेगळे झाले पण तेलंगणा चा विकास दर 9.8 % आणि आंध्रप्रदेश चा फक्त 5.5 % . तर आता तुम्हीच सांगा कि , विदर्भात तर महाराष्ट्राच्या 70 % वीज तयार होते .

 विदर्भात महाराष्ट्राच्या 70 % खनिज आहे . विदर्भात तर महाराष्ट्राच्या 70 % कापूस उत्पादन होते . विदर्भात तर 80 % जलसिंचन सुविधा उपलब्ध आहे . विदर्भात तर 54 % वनसंपदा आहे . विदर्भ तर सर्वात जास्त सोयाबीन , कापूस , डाळ , तूर , तांदूळ , संत्री महाराष्ट्राला देतो .
विदर्भात तर महाराष्ट्राच्या 9 कृषी हवामान पैकी सर्वात निश्चित पावसाचा प्रदेश आहे . विदर्भात तर पर्यटनाला खूप वाव आहे . विदर्भात तर महाराष्ट्रातील 6 व्याघ्र प्रकल्पापैकी 5 प्रकल्प आहे . तर आता सांगा कि विदर्भाचा विकास दर काय असेल .कृपया तुम्हीच विचार करा . आपण भारतातील सर्व राज्यांना मागे टाकू शकतो इतके निसर्ग देवतेने विदर्भाला भरभरून दिले आहे .फक्त विकास न होण्याचे कारण म्हणजे आपल्याला माहित नसलेली आणि पश्चिम महाराष्ट्राने हेरलेली आपली क्षमता . म्हणून विदर्भाविषयीची अस्मिता सर्वांमध्ये निर्माण होऊ द्या , आणि


अभिमानाने म्हणा                       जय विदर्भ स्वतंत्र विदर्भराज्य चळवळ-Independent Vidarbha movement

गेल्या काही वर्षात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीने जोर धरला आहे . विदर्भ प्रांत हा पश्चिम महाराष्ट्र व मुंबईच्या मानाने कितीतरी पटीने आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे , तसेच काही प्रमाणातील स्वतंत्र सांस्कृतिक बैठक हे मुद्दे धरुन स्वतंत्र विदर्भाची मागणी गेली कित्येक वर्षे स्वतंत्र राज्याचे पुरस्कर्ते करत आले आहेत .


 परंतु महाराष्ट्राच्या इतर प्रांतातून होणारा विरोधही पुष्कळ आहे . स्वतंत्र विदर्भात आर्थिक व सामाजिक प्रगती झपाट्याने होइल असा त्यांचा अंदाज आहे तर विरोधक असे मानतात की विदर्भ जर वेगळा झाला तर महाराष्ट्राकडून मिळणाऱ्या अनेक आर्थिक सोयीसुविधांना विदर्भातील जनता मुकेल व विदर्भाची प्रगती अजून खुटेल .नागपूर करार  :- 


 विदर्भ हा महाराष्ट्र राज्यात सामिल व्हावा म्हणून नागपूर येथे दि . २८ सप्टेंबर १ ९ ५३ रोजी नागपूर येथे एक करार करण्यात आला . या करारास कोणतीच कायदेशीर मान्यता किंवा वैधता नाही हा एक प्रकारचा समझोताच होता . त्यानुसार विदर्भाला संयुक्त महाराष्ट्रात ( एक मराठी भाषिक प्रदेश म्हणून ) सामील करून घेण्यात आले . राज्य पुनर्रचना आयोगाचे मत हे वेगळे होते , त्यांना मराठी भाषी प्रदेश एकत्र यायला नको होता .


इतिहास विदर्भाचा :-


      विपुल प्रमाणात दर्भ उगवणारा प्रदेश तो विदर्भ अशी याच्या नावाची व्युत्पत्ती आहे . नागपूर ही मराठा राज्यसंघातील भोसले घराण्याची राजधानी होती .


 भोसल्यांचे राज्य जवळजवळ पूर्ण मध्य - पूर्व भारतात पसरलेले होतं . १८१८ च्या तिसऱ्या इंग्रज - मराठा युद्धातील पराभवानंतर भोसल्याचा प्रभाव फक्त नागपूर विभागातच मर्यादित झाला .१८५३ मध्ये नागपूरच्या राजाचा मृत्यू झाला . त्यांच्यामागे कोणी वारस नसल्याने भोसल्यांचे राज्य इंग्रजी साम्राज्यात विलीन करण्यात आले . ( १८६१ ) .


 विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे माहेर आहे . सन १८५३ पर्यंत अमरावती आणि आसपासचा प्रदेश , ज्याला पूर्वी वहाड ( बेरार ) म्हणून ओळखले जायचे , तो हैदराबाद येथील निजामाच्या अंमलाखाली होता ..
<
 त्या वर्षी , निजामाचे अराजक बघून ब्रिटिश वसाहत अधिकरणाने या प्रदेशाचा प्रत्यक्ष ताबा घेतला . सन १ ९ ०३ मध्ये वहाड मध्य प्रांताला ( सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस ) ला जोडला गेला . सन १ ९ ४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरार हे मध्य प्रदेश म्हणून भारतातील एक राज्य झाले .


 सन १ ९ ५६ मध्ये , मराठी बोलल्या जाणाऱ्या प्रदेशांच्या एकीकरणासाठी विदर्भ क्षेत्राचा समावेश मुंबई राज्यात करण्यात आला . मुंबई इलाख्याचे सन १ ९ ६० मध्ये , भाषेच्या आधारावर महाराष्ट्र व गुजरात यामध्ये विभाजन करण्यात आले , आणि मराठी बोलणारा विदर्भ हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग झाला .


आता याच विदर्भाचे राज्य व्हावे , यासाठी प्रयत्न सुरू आहेत . पण त्यालाही विरोध होत आहे . त्यामुळे विरोधकांना काय साध्य होणार आहे                                                         
                           वेगळा विदर्भ Map

स्वतंत्र विदर्भ ' म्हणजे काय  ? WHAT IS INDEPENDENT VIDARBHA AND WHY ? :_

https://www.sabmera.co.in/2020/06/what-is-independent-vidarbha-and-why.html

Post a Comment

0 Comments