लग्न परवानगी साठी पैसे वसुली करून दिल्या कोऱ्या पावत्या : उपविभागीय अधिकारी डोंबे व तहसीलदार पवार यांच्या विरोधात पोलिसात तक्रार : तक्रार कर्त्यावरच उलटी तक्रार :झोडगे यांच्यावर लावलेले खोटे आरोप रद्द करण्यासाठी सर्वपक्षीय पुढाकार #lockdown

लग्नविधीची परवानगी घेण्याकरिता तहसील कार्यालयात ता. २ जूनला गेले असता आपणाकडून बळजबरीने पाचशे रुपये कार्यालयातील कर्मचाऱ्याने घेतले असल्याची तक्रार तिघांनी काल ता.५ जूनला पोलिसात केली आहे.
याप्रकरणी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे व तहसीलदार विजय पवार यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंद करण्याची मागणी तक्रार कर्त्यांनी केली आहे.


आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तहसील कार्यालय ब्रम्हपुरी यांना विवाहाच्या परवानगी करिता कोणतीही फी आकरण्याबाबद नमूद नाही. यावेळी आम्ही सामाजिक कार्यकर्ते विनोद झोडगे यांना बोलविले. त्यांनी तहसीलदार पवार व उपविभागीय अधिकारी डोंबे यांच्याशी चर्चा केली. यावेळी डोंबे म्हणाल्या की, आम्ही पाचशे रुपये घेणारच त्याशिवाय परवानगी देणार नाही. 
असे बोलून त्या तहासिदर यांच्या कार्यालयातून निघून गेल्या. त्यानंतर पी.एस. आय खेडीकर यांनी झोडगे यांना पोलीस ठाण्यात नेले. रात्री ८.३० वाजता पर्यंत झोडगे यांना ठाण्यात बसवून ठेवले. आपल्या विरोधात एस. डी. ओ.तक्रार करणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. मात्र, उशिरा पर्यंत तक्रार दाखल न झाल्याने जेव्हा गुन्हा दाखल होईल तेव्हा मी येईन असे म्हणून झोडगे घरी निघून गेले. यावेळेस संजय लोणारे, रामभाऊ भेदे, मंगेश कावळे व विनोद राऊत त्यांच्या सोबत होतो असे तक्रार कर्त्यानी तक्रारीत नमूद केले आहे 
गैरार्जदर तहसीलदार पवार व उपविभागीय अधिकारी डोंबे यांनी आमचेकडून बळजबरीने पाचशे रुपये घेतले. मात्र, पंचेविस रुपये, पन्नास रुपये व शंभर रुपयांच्या पावत्या आपल्याला देण्यात आल्या असेही त्यांनी तक्रारीत म्हटले असून मिळालेल्या पावत्या व कोऱ्या असलेल्या पावत्या सहपत्र म्हणून तक्रारीला जोडण्याचे म्हंटले आहे. गैर अर्जदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी त्यांनी तक्रारीत केली आहे.
झोडगे यांच्यावर लावलेले खोटे आरोप रद्द करण्यासाठी सर्वपक्षीय निवेदन -
लग्न परवानगी करिता ध्व्ज निधी च्या नावाखाली बळजबरी ने 500 रु. घेणे बंद करा व विनोद झोडगे यांच्या वर खोटे आरोप करून लावण्यात आलेले गुन्हे तात्काळ रद्द करण्यात यावे या मागणी करिता दि 8/6/2020 रोजी सर्व पक्षीय शिस्टमंडळ द्वारे उपविभागीय अधिकारी मार्फत मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री मा महसूल मंत्री, पालक मंत्री, मानव आयोग, मा जिलाधिकारी, मा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. 
यावेळी प्रा. बजाज सर, ऍड मनोहर उरकुडे, प्रा ड्रा. देवेश कांबळे, जीवन बागडे, संतोष रामटेके, ऍड हेमंत उरकुडे, ड्रा प्रेमलाल मेश्राम, प्रशांत डांगे, सूरज शेंडे, हरिदास लाडे, अमर गाडगे, कॉ विनोद झोडगे, मिलिंद भनारे , विनोद राऊत, शरद ठाकरे, संजय लोणारे, प्रकाश बागमारे, प्रा संजय मगर, विजय रामटेके, दिवाकर मंडपे, नंदकिशोर गुडेवार, सुखदेव प्रधान, नितीन पोहरे, बापूजी भरडकर इत्यादी सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments