21 जून : वडिलांप्रती असलेल्या प्रेमभावना, आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे Father's Day. फादर्स डे 1910 पासून साजरा होतो आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांचं स्थान महत्त्वाचं असतं. प्रत्येकाला त्या भावना वडिलांपर्यंत पोहोचवता येतात, असं नाही. त्यासाठी असतो हा खास दिवस. जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी Father's Day साजरा होतो.
जन्मदात्या वडिलांप्रती प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी म्हणून हा दिवस जगभरात साजरा केला जातो. तुम्हालाही आपल्या पित्याप्रतीच्या भावना, आदर, प्रेम व्यक्त करण्यासाठी sabmera.co.in व्यासपीठ देत आहे. तुमचा वडिलांबरोबरचा बेस्ट फोटो शेअर करा. बेस्ट सेल्फी इथे अपलोड करा आणि त्यासोबत लिहा तुम्हाला घडयला मदत केलेला वडिलांनी दिलेला एक धडा. वडिलांशी शिकवण आमच्याबरोबर शेअर करा.
सर्वोत्तम संदेश आणि सर्वोत्तम सेल्फीला आमच्याकडून प्रसिद्धी मिळेलच.
'फादर्स डे' हा सर्वप्रथम 19 जून 1910 रोजी वॉशिंग्टन येथे साजरा करण्यात आला अशी मान्यता आहे. हा दिवस साजरा करण्यामागे सोनोरा लुईस स्मार्ट डॉड या महिलेचा 62 वर्षांचा संघर्ष आहे.
याशिवाय इतरही अनेक सेलेब्रिटी वडील, आयुष्यातला 'बाप माणूस', सेलेब्रिटी मुलांचे संघर्ष, वडिलांची शिकवण आणि त्यासंबंधीचे लेख आणि फोटो या लिंकवर पाहायला मिळतील.
0 Comments