चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना संख्या 98 Corona positive 98 in Chandrapur district

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये १ जुलै रोजी २ बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या बाधितांची संख्या ९८ झाली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये उपचार घेणारे कोरोना बाधित ४४ आहेत. तर आत्तापर्यंत कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५४ आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार मूल तालुक्यातील सुशी गावामध्ये एक पॉझिटिव्ह रुग्ण पुढे आला आहे. नवी दिल्ली वरून परत आलेल्या २८ वर्षीय युवकाचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे.  

तर दुसरा ३० वर्षीय युवक तुकूम परिसरातील असून वाशिम येथून आला आहे. श्वसनाचा आजार जाणवत(आयएलआय ) असल्यामुळे हा युवक रुग्णालयात दाखल झाला होता. दोन्ही बाधिताची प्रकृती स्थिर आहे.


चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची शतकी वाटचाल ,
पुन्हा 8 रुग्णांची भर , आतापर्यतची बाधित संख्या ९ ५ , जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित ४२  चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये सोमवार दिनांक २ ९ जून रोजी ८ बाधितांची नोंद करण्यात आली आहे . या ८ बाधितांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या कोरोना पॉझिटिव्ह ठरलेल्याची संख्या ९ ५ झाली आहे . यामध्ये सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना बाधितांची संख्या ४२ आहे .आतापर्यंत उपचार होऊन कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या ५३ आहे . जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये ब्रह्मपुरी शहरातील पटेल नगर परिसरातील यापूर्वीच्या कोरोना बाधित असणाऱ्या कुटुंबातील ३० वर्षीय महिला व ४ वर्षीय मुलाचा समावेश आहे .

 ब्रह्मपुरी शहरातील गुजरी वार्ड येथील यापूर्वीच्या कोरोना बाधितांच्या संपर्कातील ५० वर्षीय महिला देखील आज कोरोना पॉझिटिव्ह ठरली आहे . ब्रह्मपुरी शहरातील नागपूर येथून परत आलेल्या २५ वर्षीय संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या महिलेचा २६ जून रोजी घेण्यात आलेला नमुना पॉझिटिव्ह ठरला आहे . तर गांगलवाडी येथील संपर्कातून तयार झालेल्या चार पॉझिटिव्हची आज नोंद करण्यात आली आहे . यामध्ये यापूर्वी पॉझिटिव्ह ठरलेल्या बाधिताच्या ३० वर्षीय मुलाचा समावेश आहे . गांगलवाडी येथीलच आरोग्य सेतू अॅप मार्फत मिळालेल्या माहितीनुसार एका ७० वर्षीय वरिष्ठ नागरिकाचे स्वॅब घेण्यात आले .

२८ जूनला घेतलेला हा नमुना पॉझिटिव्ह आला आहे . गांगलवाडीमध्ये संपर्कातील अहवाल मोठ्या प्रमाणात तपासले जात आहे . त्यामुळे यापूर्वी पॉझिटीव्ह ठरलेल्या बाधितांच्या ५५ वर्षीय भावाचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .
संपर्कातील नागरिकांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेणे किती गरजेचे आहे हे या उदाहरणावरून पुढे आले आहे . गांगलवाडी येथील एका तीन वर्षीय मुलीचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे .


ही मुलगी आपल्या आजोबाच्या संपर्कात आली होती .


जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रपूरमध्ये आतापर्यंत २ मे ( एक बाधित ) , १३ मे ( एक बाधित ) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ में ( एक बाधित ) २ जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १० जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७ जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) २१ जून ( एक बाधित ) २२ जून ( एक बाधित ) २३ जून ( एकूण ४ बाधित ) २४ जून ( एक बाधित ) २५ जून ( एकूण १० बाधित ) २६ जून ( एकूण २ बाधित ) २७ जून ( एकूण ७ बाधित ) २८ जून ( एकूण ६ बाधित ) आणि २ ९ जून ( एकूण ८ बाधित ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित ९ ५ झाले आहेत .


३० जून ( एक बाधित ) आणि १ जुलै ( २ बाधित )अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित ९८ झाले आहेत. आतापर्यत ५४ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ९८ पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता ४४ झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

Post a Comment

0 Comments