Car insuranceतुम्ही कारचा विमा काढलाय?

तुम्ही कारचा विमा काढलाय?


गाडय़ांच्या संख्येत होत असलेली वाढ आणि गाडय़ांमधील सुखसोयींमध्ये होत असलेले बदल याला अनुसरून विमा व्यवसायही कात टाकत आहे.


लेखाचं शीर्षक वाचून कोणताही गाडीमालक गालातल्या गालात हसेल. मात्र, खरंच गाडीचा विमा काढताना किंवा काढल्यानंतर त्याचे काय काय लाभ असतात, त्यात कोणकोणत्या पळवाटा असतात, याची इत्थंभूत माहिती फारच थोडय़ा लोकांना असते. विम्याचेही अनेक प्रकार असतात. हे सर्व जाणून घेण्यासाठी हा लेखप्रपंच..

दिवसेंदिवस रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढते आहे. त्यातही चारचाकींची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. साहजिकच वाहतूक कोंडी, प्रदूषण वगरेंत भर पडत आहे. प्रत्येक जण आपापल्या गाडीला जपत रस्त्यावरून गाडी हाकत असतो. आपल्या गाडीला काही इजा होऊ नये तसेच आपल्या गाडीमुळे दुसऱ्या कोणाला इजा होऊ नये याची खबरदारी प्रत्येक जण घेत असतो. मात्र, काही गोष्टी आपल्या नियंत्रणापलीकडच्या असतात, जसे की, समाज मानसात वाढीस लागलेली विध्वंसक वृत्ती अत्यानुधिक गाडय़ांमुळे वाढलेली वेगाची स्पर्धा, क्वचितप्रसंगी उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती (पूर, भूकंप ) त्यामुळे उद्भवणारे मोठे नुकसान. परंतु आपली गाडी आणि आपल्या गाडीचे आपत्ती व अपघातामुळे झालेले नुकसान त्याची भरपाई मिळवण्यासाठी आपल्यासमोर सावधगिरीचा उपाय म्हणून चांगल्या प्रकारचा ‘वाहन विमा’ उतरवणे हाच पर्याय उपलब्ध आहे.

गाडय़ांच्या संख्येत होत असलेली वाढ आणि गाडय़ांमधील सुखसोयींमध्ये होत असलेले बदल याला अनुसरून विमा व्यवसायही कात टाकत आहे. कोणत्याही गाडीचा विमा हा एक वर्ष कालावधीचा असतो, आता जनरल इन्शुरन्स कंपनीबरोबरच अनेक खासगी विमा कंपन्याही या स्पर्धेत आहेत. ही स्पर्धा अर्थातच ग्राहकांच्या फायद्याचीच आहे.


विम्याचे प्रकार थर्ड पार्टी विमा

या प्रकारचा विमा हा घेणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यातील तरतुदी वाहनाच्या नुकसानभरपाईसाठी नसून एखाद्या व्यक्तीस व त्याच्या वाहन अथवा मालमत्तेस वाहनामुळे नुकसान, इजा अथवा जीवितहानी झाल्यास त्याची भरपाई देण्यासाठी आहे. हा विमा न काढल्यास कायद्याच्या दृष्टीने तो गुन्हा ठरू शकतो.

साधारण सर्वसमावेशक विमा योजनाया प्रकारच्या विमा योजनेत अपघात वादळ, भूकंप, आग, पूर, दंगल यामुळे होणारे नुकसान गृहीत धरले जाते. पण गाडीचे टायर, बॅटरी, रबर प्लास्टिक भागांची (पॉलिसी काढल्या दिवसापासूनच) नुकसानभरपाई (५०% उत्पादकाने ठरवलेल्या एमआरपीच्या तुलनेत) मिळते. त्याचप्रमाणे धातू व पत्र्याच्या पार्ट्सवर पहिले सहा महिने घसारा शून्य टक्के असतो. परंतु आता यापेक्षाही अधिक चांगल्या सुविधा देणाऱ्या पॉलिसीज मिळतात त्या पाहू..शून्य टक्के घसारा


या प्रकारातील विमा योजनेत एखाद्या पादचाऱ्याला गाडीचा धक्का लागलाच त्याला कमीत कमी इजा व्हावी, तसेच गाडीचे वजन कमी करून इंधनाची बचत व्हावी यासाठी आता प्लास्टिक आणि फायबरचे पार्ट्स जास्त वापरले जातात. अपघातप्रसंगी ते पूर्णपणे निकामीही होतात. साधारण विमायोजनेत या पार्ट्सची नुकसानभरपाई ही मूळ किमतीच्या ५०% च मिळते. परंतु शून्य टक्के घसारा प्रकारातील विमा योजना घेतल्यास वर उल्लेख केलेल्या पार्ट्सचीसुद्धा १००% नुकसानभरपाई मिळते. अशा प्रकारच्या विमा योजना गाडी घेतल्यापासूनच पाच वर्षांपर्यंत मिळू शकतात.कन्झ्युमेबल सेक्युअर
आणीबाणी प्रसंगी

की रिप्लेसमेंट

नवीन तंत्रज्ञानावर आधारलेल्या गाडय़ांमध्ये आता इग्निशन कीचे स्वरूप बदलत असून त्यामागे इलेक्ट्रॉनिक कोड आणि रिमोटसारख्या गोष्टी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. अर्थातच त्यामुळे चावी हरवल्यास किंवा तुटल्यास, चोरीला गेल्यास नवीन चावी बनवण्यासाठी आणि स्कॅनरद्वारे त्याचे री-कोिडग करण्यासाठी की रिप्लेसमेंट सुविधेद्वारे नवीन चावी बनवण्याच्या ५०% पर्यंतचा खर्च विमा कंपनीकडून मिळू शकतो.

नो क्लेम बोनस


विमाधारकाने एक वर्षांच्या विमा योजनेच्या निर्धारित वेळेत कोणताही स्वरूपाचा दावा (क्लेम) न केल्यास प्रति वर्षी नो क्लेम बोनस वाढत जातो. तो ५०% पर्यंत वाढू शकतो. गाडी विकते वेळी आपल्या पॉलिसीवरती नोंद केलेला नो क्लेम बोनस आपल्याला आपल्या नवीन गाडीवरती (विमा कंपनी बदलली तरी) वापरता येतो. मात्र जुनी गाडी दुसऱ्या व्यक्तीचे नावे झाल्याचा कागदोपत्री पुरावा विमा कंपनीस / नवीन गाडी घेताना दाखवणे आवश्यक असते. प्रसंगी नो क्लेम बोनस आधीची गाडी विकल्यानंतर पुढील तीन वर्षांपर्यंत (एकदा) वापरता येतो.

पॉलिसी एक्स्प्रेस


रिटर्न ऑफ इन्व्हॉइस

या प्रकारच्या सुविधेमध्ये गाडीसाठी भरलेला एकरकमी कर आपल्याला विम्याने सुरक्षित करता येतो. एकरकमी कर हा १५ वर्षांसाठी वैध असतो. त्याच्या आकारणीसाठी सरकारी निकष खालीलप्रमाणे..
पेट्रोल इंधनावर चालणाऱ्या गाडीसाठी गाडीच्या मूळ किमतीच्या  ९%

* डिझेल इंधनावर चालणाऱ्या गाडीसाठी गाडीच्या मूळ किमतीच्या ११%
* सीएनजी. इंधनावर चालणाऱ्या गाडीसाठी गाडीच्या मूळ किमतीच्या ५%
एखाद्या दुर्दैवी प्रसंगात जसे की खूप मोठा अपघात, वाहनांची चोरी, दंगल किंवा आगीत कार भस्मसात होणे (समाजकंटकांद्वारे उभ्या असणाऱ्या वाहनांना आग लावण्याचे कृत्य सध्या वाढीस लागल्याचे आपण पाहतच आहोत) गाडीचे पूर्ण नुकसान झाल्यास एकरकमी कराची रक्कम भरपाई म्हणून परत मिळते.

Post a Comment

0 Comments