शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर खबरदार – बोगस बि-बियाणे देणाऱ्यांवर खटले दाखल करा
सध्या सर्वत्र माेठया प्रमाणात कापुस व सोयाबीनची पिके प्रामुख्यांने घेण्यात येते. परंतु बि-बियाणे बोगस निघल्याने ती उगवलीच नसल्याची गंभीर बाब समाेर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. हि गंभीर बाब असून याची दाखल घेत आमदार प्रतिभाताई धानोरकर घ्या स्वतः अधिकाऱ्यांना घेऊन वरोरा तालुक्यातील शेतीत दाखल झाल्या. त्यांनी शेतीची पाहणी करून अधिकाऱ्यांना या नुकसानग्रस्त शेतीच्या भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याचे आदेश दिले. त्याच प्रमाणे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी बोगस  बि-बियाणे देणाऱ्यांवर खटले दाखल करा असे निर्देश आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिले.
मी सुद्धा शेतकऱ्यांची मुलगी आहे. मला शेतकऱ्याचे व्यथा  व दुःख यांची जाण आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी याप्रकरणातील दोषींवर खटले दाखल करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान दिले पाहिजे असे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले. त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांच नुकसान झालेलं आहे. त्यांनी कृषी विभागाकडे रीतसर अर्ज करून पंचनामे करण्याचे आवाहन देखील यांनी केले. यावेळी आर.टी.जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी,  डॉ.नागदेवते पीकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र सिदेवाही, श्री.गोंदाने कृषी संशोधन केंद्र एकार्जुना, खांडेकर जिल्हा महाबीज प्रतिनिधी, व्ही.आर.प्रकाश, तालुका कृषी अधिकारी, जे.एस.धात्रक, कृषी अधिकारी पं.स.,वरोरा, एल.बी.सूर्यवंशी, मंडळ कृषी अधिकारी, श्री.राजू चिकटे, सभापती कृ.उ.बा स.वरोरा, मिलिंद भोयर अध्यक्ष तालुका काँग्रेस अध्यक्ष, धोपटे सभापती, पं.स.वरोरा, संजीवनी भोयर उपसभापती, पं.स.वरोरा, श्री.झाडे, पं.स.सदस्य, वरोरा व शेतकरी बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.  आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना याबाबत शेतकऱ्यांच्या  तक्रारी प्राप्त झालेल्या असुन शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापुस या पिकांची पेरणी केलेली आहेत. परंतु कृषी केंद्राकडून घेण्यात आलेली बि-बियाणे ही बोगस असल्यामुळे ती उगवलेली नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे फार माेठे प्रमाणात नुकसान झालेले आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भावामुळे आधीच शेतकरी हा फार माेठ्या विवंचनेत सापडलेला आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे सव्र्हे करून शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी किंवा तात्काळ बि-बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी कृषीमंत्री दादाजी भुुसे यांना केली आहे. 

Post a Comment

0 Comments