शाळांची घंटा वाजणार !

शाळांची घंटा वाजणार !मुंबई :
कोरोनामुळे शिक्षण थांबून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये . मात्र , विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आपण खेळूशकत नाही , हे लक्षात घेऊन विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण , तसेच शहरांपासून दूरवरील शाळा प्रत्यक्ष सुरू कराव्यात तसेच दुसरीकडे ऑनलाइन , डिजिटल पद्धत पायलट प्रोजेक्ट म्हणून तातडीने राबवावी , असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरू करण्यास मान्यता दिली . गेल्या अनेक दिवसांपासून शाळा केव्हा सुरू होणार , याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते .

आता मात्र जुलैपासून काही प्रमाणात शाळांची घंटा वाजणार आहे .


रेड झोनमध्ये नसलेल्या ९ , १० व १२ वी शाळा कॉलेज जुलैपासून , ६ वी ते ८ वी ऑगस्टपासून , वर्ग ३ ते ५ सप्टेंबरपासून , वर्ग १ ते २ री शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने , इयत्ता ११ वीचे वर्ग पुढील महिन्यात लागणाऱ्या दहावीच्या निकालानंतर सुरू करण्याचे नियोजन आहे . ज्या ठिकाणी शाळा सुरू होणार नाहीत , तिथे टाटा स्काय , जिओ यांच्या मदतीने शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट लगेचच सुरू करून त्याचा बारकाईने आढावा घेण्याचे मुख्यमंत्री म्हणाले .


ज्या ठिकाणी शाळा प्रत्यक्ष सुरू होत आहेत , तिथे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घ्यावी , असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले . शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ' शाळा एकवेळ सुरू नाही झाल्या तरी शिक्षण सुरू झाले पाहिजे ' , या विधानाचा पुनरुच्चार केला . मुख्य सचिव अजोय मेहता , शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा , "


पहिली , दुसरीसाठी ऑनलाइन नाही

ऑनलाइनबाबत पालकांच्या मतांचा विचार करण्यात आलेला आहे . पहिली व दुसरीची मुले लहान असतात , त्यांच्यासाठी ऑनलाइन पर्याय दिला जाणार नाही .३ ते ५ वीच्या मुलांना दररोज १ तास व पुढील वर्गाच्या मुलांना दोन तासांपर्यंत ऑनलाइन , डिजिटल शिक्षण देण्याचे नियोजन आहे , अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली .


शाळा सुरु करण्याचे वेळापत्रक  

वर्ग ९ , १० व १२ वी । जुलैपासून 
वर्ग ६ वी ते ८ वी । ऑगस्टपासून 
वर्ग ३ ते ५ वी । सप्टेंबरपासून
 वर्ग १ ते २ री । शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने इयत्ता ११ वी । दहावीच्या निकालानंतर । रुग्ण नसलेल्या गावांतच ... ज्या गावात अथवा भागात शाळा उघडण्यात येणार आहे , तेथे महिनाभरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही , याची खात्री करून घ्यावी लागेल . शाळा सुरु करण्यापूर्वी व्यवस्थापन समितीची सभा घ्यावी लागेल . शाळांमध्ये स्वच्छता , पिण्याच्या पाण्याची सोय आणि निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असेल .


Post a Comment

0 Comments