घरात झोपलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला : महिला गंभीर जखमी

घरात झोपलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला : महिला गंभीर जखमी

चंद्रपूर : ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या उत्तर वनपरिक्षेत्रात रात्री घरात गाढ झोपेत असलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना रात्री तालुक्यातील नियतक्षेत्र चिचखेडा अंतर्गत येत असलेल्या चीचगाव येथे घडली
प्राप्त माहितीनुसार जखमी झालेल्या महिलेचे नाव सुनंदा दादाजी वसाके (५७) रा.चिचगांव असून  रात्री 12 वाजेच्या सुमारास सदर जखमी महिला आपल्या स्वत:चे घरी गाढ झोपेत होती 


मात्र वीज पुरवठा खंडित असल्याने तसेच असह्य उकाडा होत असल्याने घराचा दरवाजा खुला ठेवून कुटुंबीय झोपले असतांना अचानक बिबट्याने हल्ला चढविला त्यात सदर महिला गंभीर जखमी झाली सदर घटनेची माहिती उत्तर वनपरिक्षेत्र अधिकारी पूनम ब्राम्हणे यांना मिळताच त्यांनी तात्काळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी रवाना केले


 आणि तात्काळ पुढील उपचारासाठी जखमी अवस्थेत सदर महीलेस ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे दाखल करण्यात आले आणि लगेच उत्तर वनपरिक्षेत्र अधिकारी पूनम ब्राम्हणे यांनी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत सुद्धा दिली परंतु दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने सदर महिलेला तात्काळ गडचिरोली येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहेसध्या पावसाळ्याची सुरुवात झाली असल्याने गावालगत असलेला जंगलाला मोठ्या प्रमाणात पालवी फुटली आहे त्यामुळे जंगलव्याप्त परिसरातील गावालगत वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे आणि म्हणून या भागातील नागरिकांनी घराच्या बाहेर अंगणात तसेच घराचे दार खुले ठेवून झोपू नये तसेच दक्षता बाळगावी


Post a Comment

0 Comments