ब्रेकिंग न्यूज चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी सप्टेंबर महिन्यात उठणारच-- नामदार विजय भाऊ वडेट्टीवार

ब्रेकिंग न्यूज चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी सप्टेंबर महिन्यात उठणारच-- नामदार विजय भाऊ वडेट्टीवार

ब्रेकिंग न्यूज चंद्रपुर जिल्हा



चंद्रपुर:-( चिमूर) :- येत्या काही दिवसात शासकीय स्तरावरील समित्या मध्ये महा विकास आघाडीतील पक्षातील पदाधिकाऱ्यांनाही विश्वासात घेऊन सामवून लवकर समित्या गठीत करणार असल्याचे सांगत. ना. विजय भाऊ वडेट्टीवार म्हणाले की चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना महापूर आहे.दारूबंदी असल्याने बोगस दारूमुळे आरोग्य धोक्यात येत असून शासनाचा महसूल बुडत आहे. जिल्ह्यातील दारूबंदी उडवायची होती परंतु सध्या स्थितीत कोरोना covid-19 महामारी असल्याने दारू बंदी उठविण्यात विलंब होत असले तरी येत्या सप्टेंबर महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी उठविणार असल्याचे ठाम सांगत आपण कोणत्याही आंदोलनात घाबरणार नसल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले.
< ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे भेटीदरम्यान पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार बोलत होते, यावेळी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस तथा जि.प सदस्य गजानन बुटके सहकार नेते संजय डोंगरे ,सरपंच रामदास सहारे , नप उपाध्यक्ष तुषार शिंदे ,मनीष नंदेश्वर , प्राचार्य राम राऊत राजू लोणारे ,प्रमोद दांडेकर, स्वप्नील धाबेकर ,माजी सदस्य ओम खैरे तसेच एच डी ओ संकपाल ठाणेदार धुळे, सियो खेवले प्राचार्य धम्मनी उपस्थित होते, दरम्यान ना. विजय भाऊ वडेट्टीवार पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांनी कार्यकर्त्यांच्या समस्येवर चर्चा केली बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments