जिल्हा सीमा बंद असताना अवैद्य दारू चंद्रपुरात दाखल होतेच कशी??? असा प्रश्न आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला

चंद्रपुर:- अवैध दारूच्या वाढत्या विक्रीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन अवैध दारू विक्री बंद करण्याचे निर्देश दिले.कोरणा च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दाखल होणाऱ्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. अशात नागरिकांना जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी E-pass ची गरज आहे हे पास काढतानाही चांगलीच दमछाक करावी लागत आहे. मात्र हा नियम दारू तसकरांनसाठी  नसल्याचेच दिसून येत आहे. जिल्हात  दाखल होणाऱ्या पॉईंट वरती पोलिस बंदोबस्त असताना जिल्ह्यात अवैद्य दारू दाखल होतेच कशी हा प्रश्न आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला असून अवैद्य दारू विक्री वर पूर्णतः आढावा घालण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना दिले आहे. आज आमदार किशोर जोरगेवार यांनी अवैध दारू विक्री च्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली असून याबाबत चर्चा केली.

Post a Comment

0 Comments