पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्‍या स्‍वप्‍नातील आत्‍मनिर्भर भारत घडविण्‍यासाठी आशिर्वाद द्या – आ. सुधीर मुनगंटीवार


चंद्रपूर :- 

महाराष्‍ट्रातील 2 कोटी 75 लक्ष मतदारांनी नरेंद्रभाई मोदी यांना दुस-यांदा पंतप्रधान केले. गरिबांच्‍या कल्‍याणासाठी, देशहीतासाठी मोदीजींनी अनेक योजना अमलात आणल्‍या. त्‍या योजनांची माहीती गोरगरीब जनतेपर्यंत पोहचविण्‍याचा उपक्रम 1 जुन पासुन सुरु झाला आहे.

  पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी म्‍हणजे ख-या अर्थाने विकासयोध्‍दा आहे. देशाला प्रगतीपथावर नेण्‍यासाठी काहीतरी वेगळे करण्‍याची उर्मी त्‍यांच्‍यात आहे. नरेंद्रभाईंच्‍या नेतृत्‍वात देशात दुस-यांदा सरकार स्‍थापन झाल्‍यानंतर धारा 370 रद्द झाले.अयोध्‍देत प्रभु श्रीरामचंद्राच्‍या मंदीराच्‍या निर्माणाचे भारतवासीयांचे स्‍वप्‍न पुर्ण झाले. नागरिकता संशोधन कायदा लागु झाला. आर्थिक सुधारणांना गती देण्‍यात आली.


भारताला आत्‍मनिर्भर बनविण्‍यासाठी राष्‍ट्रव्‍यापी अभियान हाती घेतले. कोरोनाच्‍या महामारीच्‍या जागतीक संकटाचा सामना करताना आपल्‍या ओजस्‍वी कामगीरीने जगाला दिशा दाखविण्‍याचे काम पंतप्रधान नरेंद्रभाईंच्‍या नेतृत्‍वात भारताने केले आहे.
नरेंद्रभाई मोदी यांच्‍या स्‍वप्‍नातील आत्‍मनिर्भर भारत घडविण्‍यासाठी आशिर्वाद द्यावा असे आवाहन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

Post a Comment

0 Comments