चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व C.E.O विरोधात गुन्हा

अनुकंपा तत्त्वावर 24 जणांची तात्पुरती भरती वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारावर केल्याप्रकरणी मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ दुबे यांच्याविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात 420 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बैंकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर व सी ई ओ सिद्धार्थ दुबे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या तात्पुरता शारीरिक दृष्ट्या काम असमर्थ असल्याच्या वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारावर अनुकंपा तत्त्वावर 24 जणांना पाल्यांना जिल्हा बँकेत नोकरीवर घेतले .


हा विषय बँकेचे संचालक संदीप ग़ड्डमवार, शेखर धोटे व संतोष रावत यांनी आम सभेत उपस्थित केला या प्रकारणाची तक्रार या तिन्ही संचालकांनी जिल्हा उपनिबंधक सहकार मंत्रालय नाबार्डला केली आयोगाने तर भद्रावती चां युवकाने काही महिन्यापूर्वी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. मनोहर पाऊणकार व सी ईओ सिद्धार्थ यांच्याविरुद्ध कलम 420 471 34 अन्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती ठाणेदार प्रकाश हाके यांनी दिली

Post a Comment

0 Comments