वीज वितरण कपंनी (महावितरण)च्या भोंगळ कारभाराला लगाम लावा

देश व राज्य कोरोना विषाणूच्या महामारीमूळे टाळेबंदी व संचारबंदीत अडकलेला होता.जवळपास सर्व उद्योग, व्यापार,व रोजगार पूर्णता बंद पडले असल्यामुळे नागरिकांची कमाई पूर्णता बंद झालेली आहे. अश्या अवस्थेत महावितरण कंपनीने नागरिकांना दोन – दोन खोल्याच्या घरांना पांच ते दहा हजार रुपयां पर्यंत वीज बील पाठवले आहे. 
यामुळे नागरिक दहशतीत आलेले आहेत.या समस्याची दखल घेत घुग्घुस कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजुरेड्डी व कामगार नेते सय्यद अनवर यांनी पालकमंत्री विजय भाऊ वड्डेटीवार यांची भेट घेऊन त्यांना जनतेच्या समस्येचे निवेदन दिले तसेच वीज बिलात सवलत देण्याची मागणी केली.व वीज बिल सोयीनुसार भरण्यासाठी नागरिकांना मुभा देण्याची मागणी केली.

Post a Comment

0 Comments