धक्कादायक बातमी। चंद्रपुरात सलून व्यावसायिकाची आत्महत्या

चंद्रपुर :- ऊर्जानगर येथील समता नगर या परिसरातील एका सलून  व्यावसायिकाने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. स्वप्निल चौधरी वय २७ (सत्तावीस) वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. आज 15 जून सकाळी ७.३० (साडेसात) वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. 
शेजारी राहणाऱ्या युवकाने 15 जून सकाळी ७.३० (साडेसात ) वाजताच्या दरम्यान स्वप्निल उठला नाही म्हणून आवाज दिले, परंतु काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेजारील लोक एकत्रित जमा झाले.


आणि दार उघडून बघितले तर स्वप्नील याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. त्यानंतर लगेच पोलिसांना कळविण्यात आले. 
स्वप्निल हा घरी एकटाच राहत होता. कोरोना संकटामुळे डाऊन झाल्याने सलून व्यवसाय बंद पडल्याने व्यवसायिकाची उपासमार होत असल्याने या कारणामुळे स्वप्निल या सलून व्यवसायिकाने आत्महत्या केली नसेल ना?? अशी चर्चा सध्या परिसरात सुरू आहे.
#suicide #lockdown

Post a Comment

0 Comments