चंद्रपुर जिल्ह्यात कोरोना संख्या ८० वर पोचली

ब्रह्मपुरीत आढळले 6 कोरोनाबाधित , आतापर्यतची बाधित संख्या ८० जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित २ ९ , चंद्रपूर जिल्ह्यातील ५१ बाधित कोरोना मुक्त
आयकॅन्डोनाल्ड ट्रम्प नेदरॉकर्सच्या संरक्षणासाठी ‘सत्ता’ अधिका शास्यांच्या आदेशावरील हस्ताक्षर होते


चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात आज दिवसभरात सहा नागरिक पॉझिटिव्ह आढळले आहे . त्यामुळे जिल्ह्यातील शनिवार २७ जूनपर्यंतची बाधितांची संख्या ८० झाली आहे .

तर समाधानाची बाब म्हणजे या बाधितांपैकी ५१ जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत . जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार ब्रह्मपुरी येथील विलगीकरण कक्षात असणाऱ्या चार नागरिकांचे स्वब नमुने पॉझिटिव्ह आले आहे .

 यामध्ये टिळकनगर ब्रह्मपुरी येथील 24 वर्षीय तरुणाचा समावेश आहे . नागपूर शहरातून 25 जून रोजी परतलेल्या या युवकाला गृह अलगीकरणात ठेवण्यात आले होते . त्यानंतर 26 तारखेला विलगीकरण कक्षात दाखल करून स्वब घेण्यात आले .त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे . ब्रह्मपुरी शहरातील पेठ वार्ड येथील अन्य 22 वर्षीय महिलेला नागपूर येथून 25 तारखेला परतल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते . 

चंद्रपुरात सुरु असलेल्या सर्व पुलांचे काम जलद गतीने करा आमदार जोरगेवार यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सुचना

26 ला घेतलेला त्यांचा स्वब 27 ला पॉझिटिव्ह आला आहे . तर पटेल नगर ब्रह्मपुरी येथील 65 वर्षीय आई व तिचा 34 वर्षीय मुलगा यांना अकोला येथून परत आल्यानंतर 26 तारखेला विलगीकरणात दाखल करण्यात आले होते .


 त्यांचा स्वब घेण्यात आला होता . आज २७ ला तो पॉझिटिव्ह आला आहे . या सर्व पॉझिटिव्ह रुग्णांना आता चंद्रपूर येथे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात येणार आहे .


तर अन्य दोन बाधित हे आरोग्य सेतू अॅपवरील नोंदीतून पुढे आले आहेत.यामध्ये गांगलवाडी येथील ५५ वर्षीय पुरूष , ६६ वर्षीय महिला असे हे दोन बाधित आहेत .


सर्वांची प्रकृती स्थिर आहे . चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ) , १३ मे ( एक बाधित ) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २ जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६ जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १० जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७ जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) २१ जून ( एक बाधित ) २२ जून ( एक बाधित ) २३ जून ( एकूण ४ बाधित ) २४ जून ( एक बाधित ) २५ जून ( एकूण १० बाधित ) २६ जून ( एकूण २ बाधित ) आणि २७ जून ( एकूण ६ बाधित ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित ८० झाले आहेत . आतापर्यत ५१ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे .

त्यामुळे ८० पैकी अॅक्टीव्ह बाधितांची संख्या आता २ ९ झाली आहे . सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत .
चंद्रपुरात आमदार जोरगेवार 
उद्योग नसल्यास MIDCचा प्लाट वापस घ्या, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी दिले

Post a Comment

0 Comments