चिं. प्रणय याने आपल्या यशाचे श्रेय शाळेचे वर्गशिक्षक तथा मार्गदर्शक सुनील घरत, मुख्याध्यापक प्रभू डांगी व प्रभारी केंद्र प्रमुख सन्तोष कुण्टावर आणि विषयतज्ञ रेवन मोहूर्ल आदींना दिले आहे. सिंदेवाही तालुक्यातील ऐकून आठ विध्यार्थी नवोदय परिक्षेत मेरिट आले असून सिंदेवाही तालुकाने चंद्रपूर जिल्ह्यात निकालात तिसरे स्थान पटकाविले आहे, हे इथे उल्लेखनीय आहे. यामधे जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण तिन विद्यार्थी मेरिट आले असून त्यात जिल्हा परिषद शाळा शिवणी, कुकडहेटि व टेकरि (वानेरि )शाळेचा समावेश आहे.
तर खाजगी विना अनुदानित शाळेतील एकूण पाच विध्यार्थीची नवोदय विद्यालयसाठी निवड झाली असून त्यामधे प्राजक्ता विद्यामंदिर सिंदेवाही चे दोन विध्यार्थी, कल्पतरु काण्वेण्ट सिंदेवाहीचे दोन विध्यार्थी व कल्पतरू इंग्लिश मिडीयम स्कुल नवरगावचा एक विध्यार्थी चा समावेश आहे प्रणयच्या या नेत्रदीपक यशाबद्दल सिंदेवाहीचे तहसिलदार गणेश जगदाळे ,पंचायत समिति सभापती मधुकर मडावी ,परभृत गट विकास अधिकारी गिरीश घायघुडे,गटशिक्षणाधिकारी संजय पालवे ,शिक्षण विस्तार अधिकारी डा .रवींद्र शेंडे व विषयतज्ञ प्रा .भारत मेश्राम सहित शाळा व्यवस्थापन समिति पदाधिकारी ,ग्राम सरपंच व शाळेतील शिक्षकांनी अभिनंदन केले आहे .
0 Comments