जिल्हाधिकारी साधतील १७ जुनला बुधवारी नागरीकांशी संवाद नागरिकांना थेट विचारता येणार प्रश्न

चंद्रपुर:- कोरोना जनजागृती होण्या साठी आत्मभान अभियान जिल्हा प्रशासनाने सुरु केले आहे. 


या आत्मभान अभियानांतर्गत आकाशवाणी केंद्रावर फोन-ईन कार्यक्रम सुरु झालेला आहे. २० जुन शनिवार  रोजी प्रसारित होत असलेल्या कोरोना आणि प्रशासनाची तयारी या विषयावर १७ जुन बुधवार रोजी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधनार आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी कशी आहे,जिल्ह्यातील कोरोना विषयीच्या काळामधील सध्या स्थिति काय आहे, प्रशासनातील यंत्रणा कशा पद्धतीने काम करीत आहे असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील तर आपण थेट फोन करुन हे प्रश्न विचारु शकता.

या फोन-ईन कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण दि.१७ जुन बुधवार रोजी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरीकांनी सकाळी ११ ते ११.३० या वेळेत जास्तीत जास्त ०७१७२-२५४६३४ या संपर्क क्रमांकावर संपर्क करुन आपल्या मनातील प्रश्न विचारु शकता. या कार्यक्रमाचे प्रसारण दि.२० जुन शनिवार रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.

Post a Comment

0 Comments