वीज बिल माफ करा -आप चे स्वाक्षरी अभियान सुरू


चंद्रपूर :- आम आदमी पार्टी चंद्रपूर महानगर तर्फे संचार बंदी च्या काळातील 200 युनिट शासनाने माफ करावे म्हणून जनतेमध्ये जाऊन स्वाक्षरी अभियान सुरू असून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. संचार बंदी च्या काळात अनेक कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. आम आदमी पार्टीने महाराष्ट्र शासनाला एक महिन्यापूर्वी निवेदन देऊन प्रति महिना 200 युनिट वीज बिल माफ करण्याची विनंती केली होती. आप ने हा मुद्दा घेऊन जनतेमध्ये जाऊन स्वाक्षरी अभियानाला सुरुवात केली आहे.

  शहरातील विठ्ठल मंदिर वार्ड, ताजमहल वार्ड,बंगाली कॅम्प, बाबुपेठ सह ईतर वार्डत चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अभियानात जिल्हा संयोजक सुनील मुसळे, संघटन मंत्री परमजीत सगळे, सचिव संतोष दोरखंडे, योगेश आपटे, सिकंदर तागोरे, दिलीप तेलंग, प्रशांत येरने, सुनील भोयर,दिलीप तेलंग, अजय डुकरे, राजेश चेडगुल्लवार, गंगा चौधरी, राजू कुडे, श्याम वांढरे आदी कार्यकर्त्यांचा सहभाग आहे.

Post a Comment

0 Comments