शनिवार दि. २७ जुन २०२० रोजी गडचांदुर न.प. चे स्विकृत सदस्य पाप्पय्या पोन्नमवार यांच्या फेसबुक स्टेटस् मध्ये रात्री जवळपास १० च्या नंतर ब्ल्यु फिल्म अपलोड करण्यात आली.
ही फिल्म गडचांदुर शहरासह अनेक ठिकाणच्या त्यांच्या फेसबुक वरील मित्रांनी बघितली असण्याची शक्यता आहे.
पाप्पय्या पोन्नमवार हे राजुरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे मोठे. प्रस्थ आहे. काँग्रेसचे सक्रिय पदाधिकारी असलेले पाप्पय्या पोन्नमवार सद्यस्थितीमध्ये गडचांदुर नगर परिषदेमध्ये स्विकृत सदस्य आहेत. गडचांदूर परिसरात किंग मेकर अशी ख्याती असलेले धनाढ्य मद्य सम्राट पाप्पय्या पोन्नमवार यांची राजुरा व गडचांदुर मध्ये ओळख आहे.
पाप्पया पोन्नमवारांनी अनेकांचे राजकीय आयुष्य घडविले (बिघडविले(?)) आहे. पाप्पया पोन्नमवार यांच्या फेसबुक स्टेटस्मध्ये दिसणारी चित्रफित/फोटो हा अनेकांसाठी तोंडात बोटे टाकणारा विषय होता. मनुष्य म्हणून अनेकांनी विविध शौक-छंद-आवडी(?) पोसल्या-जोपासल्या आहेत, त्यातील बऱ्याचशा वाईट ही असतात, त्या सार्वजनिक व्हायला नको यासाठी प्रत्येक जण आपापल्या परिने जपत असतो.
समाजसेवक, राजकारण्यांचे याकडे विशेष लक्ष असते. कारण राजकारणी, समाजसेवक म्हणजे सर्वसामान्यांशी, त्यांच्या कुटूंबांशी सरळ जुळणारे विशेष व्यक्तीमत्व असते. दोष साऱ्यांमध्येचं असतात, परंतु आपल्या दोषाला सांभाळूनचं समाजसेवा करावी लागते.
समाजसेवकांकडून, राजकारण्यांकडून सर्वसामान्यांना फार अपेक्षा असतात.
एखाद्या समाजसेवकांच्या आंबट आवडी (?) समाजमाध्यमांवर (सोशल मिडीयावर व्हायरल होत असेल तर ते घोकादायक आहे, हे ओळखून गडचांदुर चे हित जोपासणाऱ्यांनी त्या आपल्या मोबाईल मध्ये केल्या, त्यांच्याच हितचिंतकांनी त्या व्हायरल केल्या.
रविवार दि. २८ जुन रोजी गडचांदुर-राजुरा याठिकाणी या पाप्पय्या पोत्रमवार यांच्या फेसबुक स्टेटस् वरील हे चाळे अनेकांच्या मोबाईलवर फिरू ही लागल्या. त्यानंतर आज सकाळी (२८ जुन) पाप्पय्या पोन्नमवार यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी हे स्टेटस् डिलीट केले आणि त्याबद्दल दिलगिरी ही व्यक्त केली. परंतु ही दिलगिरी व्यक्त करतांना त्यांचा अज्ञानपणा स्पष्ट जाणवणारा होता.
त्यांनी दिलगिरी च्या पोस्ट मध्ये आपल्या लहान मुलांच्या हातांनी ही चुकी झाल्यांचे लिहीले आहे. पाप्पया यांचा लहान मुलगा अंदाजे ७ वर्षाच्या वर नाही, असे गडचांदुरवासी सांगतात. मग झालेली चुक ही पाप्पया यांच्यामुळेचं झाली होती. त्याठिकाणी त्यांनी आपल्या मुलाला चुकीवर पर्दा टाकण्यासाठी वापरायला नको होते, याची ही चर्चा आज दिवसभर गडचांदुर मध्ये होत होती.
<
पाप्पय्या यांनी ही चुकी स्वतः कबुल करून आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा किंवा बरिष्ठ काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पाप्पय्या पोत्रमवार यांचेकडून पक्षाचाचं राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी आज गडचांदुर शहरामध्ये होत आहे.
0 Comments