शिक्षक भारतीची शिक्षणाधिकारी यांचेशी विविध विषयांवर चर्चा

शिक्षक भारतीची शिक्षणाधिकारी यांचेशी विविध विषयांवर चर्चा


शालेय समस्या व नविन शैक्षणिक वर्षात कोरोना महामारीमुळे शाळांसमोर उभ्या ठाकलेल्या समस्याशिक्षकांच्या विविध समस्यांवर माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांचेशी त्यांच्या कक्षात शिक्षक भारती शिष्टमंडळाची चर्चा झाली.

शालेय समस्या व नविन शैक्षणिक वर्षात कोरोना महामारीमुळे शाळांसमोर उभ्या ठाकलेल्या समस्या आणि शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वेतन , भविष्य निर्वाह निधी कर्ज, सेवानिवृत्त कर्मचारी यांचे अंतीम भविष्य निर्वाह निधी हप्ता तथा सन 2019-20 च्या भ.नि.नि. व C.P.F .पावत्या तयार करून वितरण करणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष भाष्कर बावनकर यांनी कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या विविध समस्या याप्रसंगी कथन केल्या.

याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मधुकर चापले,मुख्याध्यापक संघाचे सचिव विनोद पिसे हे उपस्थित होते. 
याप्रसंगी शिक्षक भारती संघटना चंद्रपूर चे वतीने जिल्हाध्यक्ष भाष्कर बावनकर यांनी शिक्षणाधिकारी यांना वरील समस्यांचे निवेदन दिले.


समस्या लवकरच निकाली काढू असे आश्वासन याप्रसंगी शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांनी दिले

Post a Comment

0 Comments