बदर कोल ब्लाक लिलाव यादीतून वगळा , ईको प्रो ने केले निदर्शने

चंद्रपूर : बंदर कोल ब्लॉक कोल इंडिया च्या लिलाव च्या यादीत आल्यामुळे इको प्रो तर्फे विरोधात निदर्शने करण्यात आली . ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तर दिशेस बफर क्षेत्रात लागून असलेल्या बंदर कोल ब्लॉक कोल इंडिया तर्फे लिलाव करण्यात येणाऱ्या 41 कोल ब्लॉक अंतर्गत या कॉल ब्लॉकचा समावेश आहे .ताडोबा - बोर - मेळघाट वन्यप्राणी कॉरिडोर - भ्रमण मार्ग संकटात येणार आहे . यापूर्वीसुद्धा 2010 मध्ये तत्कालीन पर्यावरण मंत्री श्री जयराम रमेश यांची दिल्ली येथे भेट घेत इको प्रो शिष्टमंडळाने संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांच्या नेतृत्वात निवेदन देत सदर कोळसा खाणींमुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा महत्त्वाचा कोरडोर नष्ट होणारअसल्याने जिल्ह्यातील व्याघ्र संवर्धनाकडे लक्ष वेधण्यात आले होते . याची लगेच दखल घेत एन टी सी ए मार्फत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना पत्र देण्यात आले सोबतच एनटीसीए ची एक कमिटी सुद्धा बंदर कुठून कोल ब्लॉक क्षेत्रात पाठवण्यात आलेली होती . यानंतर ब्रह्मपुरी वनविभाग , ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प तर्फे सदर कोळसा खान ताडोबा सोबतच व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सदर खान प्रकल्प धोकादायक असल्याचे केले होते . यापूर्वी सुद्धा 1999 मध्ये सदर कोल ब्लॉक ची परवानगी नाकारण्यात आलेला होता . नमूद सध्या चंद्रपूर जिल्ह्यात वाढलेली वाघाची संख्या , आवश्यक व्याघ्र अधिवास ची कमतरता , दिवासागणिक वाढत असलेला जिल्ह्यातील वाघ - मानव संघर्ष , व्याघ्र कॉरिडोर म्हणजेच वन्यप्राण्यांच्या भ्रमण मार्ग अधिक सुरक्षित करीत संवर्धन करण्याची गरज असताना अशातच सदर कॉल ब्लॉक चा लिलाव म्हणजे ताडोबा प्रकल्प व व्याघ्र संवर्धनासाठी धोक्याची घंटा आहे , यामुळे इको - प्रो संस्थेने निदर्शने करीत सदर ‘ बंदर कोल ब्लॉक ' कोल इंडियाच्या लिलाव यादीतून वगळण्याची मागणी करण्यात आलेली आहे . कोरोना च्या पार्श्वभूमिवर सदर निदर्शने करताना सोशल डिस्टन्स पाळून , मास्क चा वापर करित निदर्शने करण्यात आली . यावेळी बंडू धोत्रे यांच्या नेतृत्वात नितिन रामटेके , अब्दुल जावेद , धर्मेंद्र लुनावत , सुधीर देव , वैभव मडावी , सुमित कोहले , बिमलर , राजू हाडगे , संजय गावंडे , कुणाल कर सहभागी झाले .Post a Comment

0 Comments