एन. आर. एच एम. च्या कंत्राटी कर्मचा-यांना सरळ सेवेत सामावुन घ्या, यंग चांदा ब्रिगेडची मागणी


चंद्रपूर शहर महानगरपालिकेत एन. आर. एच एम  अंतर्गत आरोग्य विभागात काम करत असलेल्या  कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवेला  १४  कालावधी लोटलेला आहे. त्यातही कोरोना काळातील या कर्मचा-यांची सेवा कौतूकस्पद आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या कर्मचा-यांना सरळ सेवेत सामावुन घेण्यात यावे अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून या मागणीचे निवेदन मनपा आयूक्त राजेश मोहिते यांना देण्यात आले आहे. यावेळी मोहिते यांनीही याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याचे आश्वासन दिले आहे.
          संपुर्ण जगाला कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. या कठीण परिस्थितीत शासकीय कर्मचा-यांसोबत कंत्राटी कर्मचारीसुध्दा अहोरात्र झटत आहे. यात  एन. आर. एच. एम च्या कर्मचा-यांची भूमीकाही मोठी आहे. राज्यभरात २० हजारापेक्षा अधिक कर्मचारी सेवा देत असून कोरोनाच्या संकट काळात हे कर्मचारी जिवाची पर्वा न करता सेवा देत आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत एन.आर.एच.एम. कर्मचारी तटपुंज्या मानधनावर काम करत आहे. असे असतांनाही त्यांची रुग्णसेवा सुरु आहे. मात्र प्रशासनाच्या वतीने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. या सर्व कंत्राटी कर्मचा-यांचे आर्थिक व कौटुबिक जीवन हे नौकरीवरच अवलंबुन आहे. मात्र अल्प मानधनामूळे त्यांच्यावर आर्थिक संकट आले आहे. त्यामूळे त्यांची सेवा लक्षात घेता त्यांना सरळ सेवेत सामावून घेण्यात यावे अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. काल सोमवारी यंग चांदा ब्रिगेडच्या शिष्ट मंडळाने चंद्रपूर महानगरपालिका आयूक्त राजेश मोहिते यांची भेट घेतली असून या कर्मचा-यांच्या मागण्यांवर चर्चा केली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या शहर संघटीका वंदना हातगावकर यांच्यासह एन. आर. एच. एम च्या कर्मचा-यांचीही उपस्थिती होती. यावेळी या कर्मचा-यांना सरळ सेवत सामावून घेण्यात यावे तसेच कोव्हीड संकटात सेवा दिल्या बदल त्यांना अतिरिक्त मानधन देण्यात यावे या मागणीचे निवेदनही मनपा आयुक्तांना देण्यात आले. मनपा आयुक्तांनीही अतिरिक्त वेतन संदर्भात मनपाच्या आमसभेत ठराव मांडण्याचे आश्वासन दिले असून सरळ सेवेत सामावून देण्यात शासनाला प्रस्तावर पाठविण्याचेही आश्वासन यावेही मनपा आयुक्तांनी दिले आहे.

Post a Comment

0 Comments