मूल शहरात चितळाचे दर्शन

मूल : 18/06/2020
भटकुन शहरात मुक्तसंचार करणाऱ्या चितळाच्या पाठीमागे कुञे धावल्याने सैरावरा पळत सुटलेल्या चितळाने आज नागरीकांची चांगली करमणुक केली.


आज पहाटे ५.३० वा. सुमारास एक चितळ कन्नमवार सभागृहाचे मागे असलेल्या पाटबंधारे कार्यालयाच्या आवारात फिरत असल्याचे काही नागरीकांना दिसले. सदर कार्यालयाला संरक्षण भिंत असली तरी प्रवेशव्दार माञ सुरूच राहते, त्यामुळे जंगलातुन भटकुन शहरात आलेले हे चितळ पहाटेच्या शांत वातावरणात पाटबंधारे कार्यालयाच्या परीसरात मुक्तसंचार केल्यानंतर सदर चितळ नगर परीषद कार्यालयाच्या पाठीमागे काही वेळ राहीला. शहरात नवीन प्राणी आल्याचे दिसताच शहरातला एक भटका कुञा त्याचेवर भुंकु लागला. एका कुञ्याच्या भुंकण्यामुळे लागलीच त्याठिकाणी चार ते पाच कुञे जमा होवुन चितळाचा पाठलाग करू लागले.

कुञ्यांच्या पाठलागामूळे घाबरलेला चितळ जीव वाचविण्यासाठी सैरावरा पळत सुटला. पळता पळता शहराच्या मध्यभागी असलेल्या रामलिला भवनाच्या प्रांगणात आला. त्याही ठिकाणी कुञे भुंकु लागल्याने परीसरातील नागरीकांनी सदरचा प्रकार प्राणी मिञ उमेशसिंह झिरे यांना सांगितले. लागलीच झिरे यांनी सदर स्थळी धाव घेवुन चितळ असल्याची खाञी केली. त्यांनी त्याची माहीती विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या वनक्षेञ अधिकारी पल्लवी जोशी यांना माहीती दिली. चितळ लोकवस्तीत असल्याची माहीती मिळताच सदर ठिकाणी विशेष व्याघ्र सरंक्षण दलाचे पथक हजर झाले. जंगलातुन भरकटुन शहरात आलेल्या चितळाला सुरक्षित पकडुन जंगलात सोडण्याचे प्रयत्न सुरू झाले.परंतु कुञ्यांचे भुंकणे आणि पाहणाऱ्यांची गर्दी पाहुन घाबरलेल्या चितळ वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना गुंगारा देवुन सैरावरा पळत जुन्या रेल्वे स्टेशनच्या मागील बाजुला आला. दरम्यान सैरावरा पळत सुटलेला चितळाचा पाठलाग करीत विशेष व्याघ्र दलाचे कर्मचारी जुन्या रेल्वे स्टेशन परीसरात आल्यानंतर त्याठिकाणी नागरीकांची गर्दी वाढली.
त्याही ठिकाणी गुंगारा देवुन पळालेल्या चितळ ताडाळा मार्गाकडे गेला, पकडण्यास आलेल्या कर्मचाऱ्यांनी आपला मोर्चा ताडाळा मार्गाकडे वळविला. चितळ असल्याचे परीसरात नियोजनबध्द सापडा रचुन शेवटी अथक प्रयत्नानंतर विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या कर्मचाऱ्यांनी चितळास अलगद पकडले.


जंगालातुन भरकटुन शहरात आलेल्या चितळाला पकडण्या साठी विशेष व्याघ्र सरंक्षण दलाचे वनपरिक्षेत्र अधिकारी पल्लवी चव्हाण, प्राणीमित्र उमेशसिंह झिरे, प्रादेशीक वनविभाग मूलचे क्षेत्रसहाय्यक प्रशांत खनके, वनरक्षक सुभाष मऱ्हसकोल्हे, स्वंयसेवक राम करकाळे, अंकुश वाणी यांचेसह वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी अथक परीश्रम घेतले. येथील पशु चिकित्सालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर सदर चितळास मूल डोणी मार्गावरील जंगलात सोडण्यात आले.


अंदाजे तीन वर्ष वयाचा असलेला चितळ नर प्रजातीचा होता. जंगला लगतच्या गांवात प्राणी येतात याचा प्रत्यय आज मूल वासियांना आला. विशेष म्हणजे दोन दिवसांपुर्वी दिड वर्ष वयाची जंगलात राहणारी भेडकी तालुक्यातल्या मारोडा गांवात आली होती.


त्याही ठिकाणी कुञ्यांनी हल्ला केल्याने उपचाराअंती भेडकी मृत्यू पावल्याची घटना घडली होती.
आज दिवसभर या हरीणीच्या आगमनाचीच चर्चा मूल शहरात होती.


 काही कां असेना जंगलातला चितळ आज नागरीकांना लोकवस्ती मध्ये पाहता आला.

Post a Comment

0 Comments