नागपूर व पुणे प्रकरणातील आरोपींना फाशी द्या - राजस खोब्रागडे**नागपूर व पुणे प्रकरणातील आरोपींना फाशी द्या -  राजस खोब्रागडे*


महाराष्ट्र राज्याची ओळख संपुर्ण देशात फुले-शाहू-आंबेडकर यांचे पुरोगामी विचारांचा म्हणून आहे.तरी अलीकडच्या काळात जातीयवादी मानसिकतेचे लोक राज्यात दलित युवकांवर हल्ले  करत असल्याचे निदर्शनास येत आहेत.
22 मे 2020 रोजी नागपूर ग्रामीण येथील आबेडकरी चळवळीत कार्य करणाऱ्या 22 वर्षीय युवकांवर जातीयवादी लोकांनी  प्राणघातक हल्ला त्यामध्ये अरविंद बंनसोडचा जीव गेला हा प्रकार अत्यंत लज्जास्पद आणि निंदनीय आहे.
त्या नंतर अलीकडे पिंपरी सौदागर येथील 20वर्षीय विराज जगताप या विद्यार्थ्यांला गावातील स्वर्ण समाजातील एकाच कुटुंबातील  लोकांनी त्याची निर्घृण हत्या केली आहे राज्यात सध्या परभणी,पुणे,नागपूर, अहमदनगर या ठिकाणी दलितांवरील होणारे हल्ले बघता कायदा आणि सुव्यवस्था सर्व उच्च वर्णीय आणि जातीयवादी लोकांच्या हातात असल्याचे भासत आहे,

या सर्व घटना अत्यंत लाजिरवण्या असून या सर्व घटनेतील लोकांना कायद्याद्वारे फाशीची शिक्षा देऊन  जातीयवाद मानसीकतेला आळा घालण्यासाठी आम्ही रिपब्लिकन स्तुडेंट फेडरेशन च्या वतीने राजस प्रवीण खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली मा. जिल्अधिकारी यांच्या मार्फत राज्यजे मा.मुख्यमंत्री याना निवेदन देणायत आले यावेळी संघपाल सारकाटे,लुम्बिनी गणवीर,हर्षल खोब्रागडे, नयन अलीने,शुभम शेंडे,कपिल गणवीर,संगम शेलकर यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments