14 दिवसानंतरही अंकिता लोखंडेचे अश्रू थांबेना, सुशांतची घ्यायची आईसारखी काळजी

       

14 दिवसानंतरही अंकिता लोखंडेचे अश्रू थांबेना, सुशांतची घ्यायची आईसारखी काळजी
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा त्याची पूर्वाश्रमीची गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडेला जबर धक्का बसला आहे
अंकिता गेल्या 14 दिवसांपासून सतत रडते आहे. क्षणभरासाठीही तिचे अश्रू थांबलेले नाही, असा खुलासा अंकिताचा मित्र संदीप सिंगने केला आहे.फोनवर बोलतानाही ती आपले अश्रू रोखू शकत नाहीये.अंकिता प्रचंड इमोशनल आहे, याचमुळे सुशांतच्या मृत्यूच्या धक्क्यातून ती सावरू शकलेली नाही.

अंकिता सुशांतवर जीवापाड प्रेम करायची. त्याची अगदी आईसारखी काळजी घ्यायची, असे संदीप सिंगने सांगितले.सुशांतच्या आवडीनुसार, तिने तिचे घर सजवले होते. त्याच्या आवडीच्या जेवणापासून तर त्याच्या गरजेच्या प्रत्येक वस्तूची काळजी ती घ्यायची.

सुशांत व अंकिता जवळपास सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.पवित्र रिश्ता या मालिकेच्या सेटवर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते.दोघेही लग्न करणार असे वाटत असतानाच अचानक त्यांचे ब्रेकअप झाले होते.
Sabmera.co.in

Post a Comment

0 Comments