
राज्य शासनाने जिल्हा अंतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचे अनुषंगाने उद्या दिनांक 22 पासून 31 तारखेपर्यंत एकूण प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी घेऊन एसटी बसेस उद्यापासून जिल्हाअंतर्गत धावणार आहेत.
सुरक्षित सामाजिक अंतर ठेवण्या बाबतचे सूचनाही या आदेशात दिले आहे.जिल्हा अंतर्गत बस सवा सुरू झाल्यामुळे सामान्य वर्गांना मोठा दिलासा मिळणार आहे

◾️तब्बल 2 महिन्यानंतर जिल्हा अंतर्गत एसटी बसेस धावणार.
◾️राजुरा आगारातील बसेस सज्ज.
◾️नागरिकाने सुरक्षितेचे नियम पाळावे- आशिष मेश्राम, आगार प्रमुख, राजुरा.

रेडझोन व कंटेंनमेंट झोन वगळता राज्यातील इतर भागात उद्यापासून जिल्हा-अंतर्गत एसटी बस सेवा सुरु होत आहे. राजुरा आगाराअंतर्गतही जिल्हाअंतर्गत बस सेवा उद्या दिनांक 22 मे पासून सुरू होत आहे . कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने प्रवाशांनी सुरक्षिततेचे नियम पाडावे असे आवाहन आगारप्रमुख आशिष मेश्राम यांनी केले.
कोरोना महामारीचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने राज्यशासनने दिलेल्या निर्देशानुसार रेड झोन व कंटेंनमेंट झोन वगळता राज्यातील इतर विभागामध्ये काही अटीशर्तींच्या अधीन राहून उद्या दि. २२ मे पासून जिल्हा-अंतर्गत एसटी बससेवा सुरु होणार आहे. २३ मार्च पासून गेले दोन महिने मुंबई व उपनगरात अत्यावश्यक सेवा वगळता एसटी बस सेवा संपूर्ण महाराष्ट्रात बंद आहे.
परंतु लॉकडाऊन च्या चौथ्या कालखंडामध्ये राज्यशासनाने रेड झोन व कंटेंनमेंट झोन वगळता काही अटीशर्तींच्या अधीन राहून एसटी महामंडळाला केवळ जिल्ह्या-अंतर्गत (जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच) एसटी बस सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील निवडक मार्गावर उद्यापासून एसटी बस सेवा सुरु होत आहे. अर्थात,त्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
१. जिल्हा-अंतर्गत सकाळी ७.०० ते संध्याकाळी ७.०० पर्यंत हि बस सेवा सुरु राहील.
२. प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक केलेल्या असतील.
३. सोशल डिस्टंसिंगचा वापर करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० % प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असेल.
४.जेष्ठ नागरिक व १० वर्षाखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही. (अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून )
५. प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने प्रवास सुरु करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे.
६. प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे.
वरील अटी व शर्तींचे काटेकोरपाने पालन करून सर्वसामान्य प्रवाशांनी कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळास सहकार्य करावे असे आवाहन आगारप्रमुख आशिष मेश्राम यांनी केले आहे.
0 Comments