Lockdown 5.0 Update


Lockdown 5.0
 प्रवासासाठी परवानगीची गरज नाही, लॉकडाऊन 5 चे नियम आणि टप्पे कोणते?

कोरोनामुळे देशात सुरु असलेला लॉकडाऊन 30 जूनपर्यंत (Lockdown 5 guidelines) वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने नियमावली जारी करत लॉकडाऊन पाचची घोषणा केली. कंटेन्मेंट झोनमधील नियम जसे आहेत तसेच राहतील, पण अन्य झोनमध्ये बरीच मुभा देण्यात आली आहे. 1 जून ते 30 जूनपर्यंत लॉकडाऊन असेल. (Lockdown 5 guidelines)


हा लॉकडाऊन घोषित करताना केंद्राने राज्य सरकारकडे अधिक अधिकार दिले आहेत. आता राज्य किंवा जिल्ह्यांतील प्रवासासाठी परवानगीची गरज नाही. मात्र राज्यातील वाहतूक व्यवस्थांबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकार घेईल. केंद्र सरकारने वाहतुकीबाबत निर्बंध हटवले आहेत.

रात्रीचा कर्फ्यू कायम
रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत आता कर्फ्यू असेल. यापूर्वी ही संचारबंदी संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत होती. शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांबद्दल निर्णय नंतर घेण्यात येईल.कंटेनमेंट झोनबाहेर जवळपास सर्व उघडणार
कंटेनमेंट झोनमध्ये सर्व बंद असेल, मात्र त्याबाहेर अनेक मुभा देण्यात आल्या आहेत. यासाठी टप्प्याटप्प्याने सूट देण्यात आली आहे.
पहिला टप्पा – 8 जूनपासून पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल उघडले जातील. मात्र यासाठी नियम आणि अटी लागू असतील.दुसरा टप्पा – यामध्ये शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्था उघडल्या जातील. मात्र त्याबाबत राज्य सरकार आपल्या स्तरावर निर्णय घेतील. पालकांशी चर्चा करुन त्याबाबत निर्णय घेतला जाईल. जुलै महिन्यात शाळा सुरु करण्याचा विचार आहे, मात्र त्याबाबत राज्य सरकारांनीच ठरवायचं आहे. त्यामुळे शाळा सुरु होणार की नाही हे जुलैमध्येच ठरेल.
तिसरा टप्पा – तिसऱ्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय विमाने, मेट्रो रेल्वे, सिनेमा थिएटर, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेन्मेंट पार्क, बार आणि ऑडिटोरियम याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.कुठेही प्रवासासाठी परवानगीची गरज नाही
सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंटेन्मेंट झोन वगळता आता कुठेही प्रवास करता येणार आहे. त्यासाठी कोणत्याही परवानगीची किंवा ई-पासची गरज नाही. मात्र राज्य सरकारने त्याबाबत निर्णय घ्यायचा आहे. जिल्ह्यांमध्ये किंवा आंतरराज्य प्रवास करु द्यायचा की नाही हे राज्यांनी ठरवायचं आहे, मात्र केंद्राने या प्रवासाला परवानगी दिली आहे.


नव्या गाईडलाईन्सनुसार काय उघडणार? काय बंद?1.कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम असणार
2. कंटेनमेंट झोनमध्ये 1 जून ते 30 जूनपर्यंत लॉकडाऊन
3. रेड झोन बाहेर 8 जूनपासून मंदीर,मशिद धार्मिक स्थळं उघडणार
4. रेड झोन बाहेर 8 जूनपासून रेस्टॉरंट, हॉटेल्सही उघडणार
5. रेड झोन बाहेर  8 जूनपासून शॉपिंग मॉल्सनाही उघडण्याची परवानगी
6. राज्यांतर्गत वा राज्या-राज्यात सर्व दळणवळणावर बंदी नाही
7. कसलीही परवानगी, मंजुरी व ई-परमिटची गरज नाही
8. दळणवळणासंबंधी राज्यांना अंतिम निर्णयाचे अधिकार
9.प्रतिबंधित क्षेत्रे राज्येच ठरवणार
10.प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू
11.शाळा सुरु करण्यासंबंधी जुलैमध्ये निर्णय
12. राज्यांशी चर्चा करुन शाळांबाबत निर्णय घेणार

Post a Comment

0 Comments