चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 21 रुग्ण रविवारी 21 वर The number of corona positive patients in Chandrapur district is 21 patients on Sunday 21


चंद्रपूर :

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची त्यामध्ये भर पडली आहे. २३ मे रोजीच्या रात्री दिडच्या सुमारास  चार अहवाल पॉझिटिव्ह आले होते .त्यामुळे २४ मे रोजी सकाळी १९ पर्यंत पोहोचलेली पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी सायंकाळी २१ झाली आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार 24 मे रोजी सायंकाळी आणखी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हे दोन्ही रुग्ण दाखल आहेत.

नव्याने पॉझिटिव ठरलेले रुग्ण पुढीलप्रमाणे आहे

१. चंद्रपूर शहरातील बालाजी वार्ड परिसरातील एक 24 वर्षीय युवक 11 मे रोजी पुण्यावरून आल्यानंतर होम कॉरेन्टाइन झाला होता. लक्षणे दिसल्यानंतर  रुग्णालयात दाखल झाला. 22 मे रोजी त्याचे स्वॅब घेण्यात आले होते.

२. दुसरा रुग्ण यापूर्वी विसापूर येथील पॉझिटिव्ह ठरलेल्या रुग्णाची आई आहे. ती देखील सध्या चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल आहे. 22 तारखेला या 45 वर्षीय महिलेचे स्वॅब घेण्यात आले होते.

      
हे दोन नवीन रुग्ण आज 24 मे रोजी पॉझिटिव्ह ठरल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 21 झाली आहे.
      

चंद्रपूरमध्ये २ मे ( एक रुग्ण ), १३ मे ( एक रूग्ण) २० मे ( एकूण १० रूग्ण ) २३ मे ( एकूण ७ रूग्ण ) व २४ मे ( एकूण रूग्ण २ ) अशा प्रकारे जिल्हयातील रुग्ण २१ झाले आहेत.Chandrapur:The total number of corona positive patients in Chandrapur district has now risen to 21. Two more patients were added on Sunday evening. On the night of May 23, around 1.30 pm, four reports were positive.

According to the district health department, two more patients tested positive on the evening of May 24. Both the patients have been admitted to Chandrapur Medical College Hospital.The newly positive patient is as follows1. A 24-year-old youth from Balaji ward area of ​​Chandrapur city was home quarantined on May 11 after returning from Pune. He was admitted to the hospital after showing symptoms. His swab was taken on May 22.2. The second patient is the mother of a patient previously tested positive at Visapur. She is also currently admitted to Chandrapur Medical College Hospital. The 45-year-old woman was swabbed on the 22nd.      

The two new patients tested positive on May 24, bringing the total number of positive patients in Chandrapur district to 21.

      In Chandrapur, 2 May (one patient), 13 May (one patient), 20 May (10 patients in total), 23 May (7 patients in total) and 24 May (2 patients in total) have become 21 patients in the district.

Post a Comment

0 Comments