चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 19 वर The number of corona positive patients in Chandrapur district is at 19

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 19 वर

चंद्रपूर | चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे २३ मे रोजी रात्री १५ पर्यंत पोहोचलेली पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मध्यरात्री नंतर वाढून १९ झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार २३ मे च्या रात्री उशिरा नागपूर येथून प्राप्त अहवालामध्ये चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी दोन रुग्ण वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आहेत. तर दोन रुग्ण संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत.

१. यामध्ये मुंबईवरून आलेला मौजा वरवट येथील पंचवीस वर्षाच्या युवकांचा समावेश आहे. हा युवक 17 मे रोजी अन्य सहा लोकांसोबत मुंबईवरून चंद्रपूर येथे आला होता. या युवकाला संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. 22 मे रोजी स्वॅब नमुना घेण्यात आला होता.

२. घुगुस येथील पंचवीस वर्षीय महिला 14 मे रोजी पुण्यावरून आली होती. ती होम कॉरंन्टाइन होती. लक्षणे दिसून आल्यामुळे 22 मे रोजी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल झाली. 22 रोजी या महिलेचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते.

३. नाशिक मालेगाव येथून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील मूल तालुक्यातील चिरोली येथील २७ वर्षीय व्यक्तीला संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या युवकाचा स्वब नमुना 22 मे रोजी घेण्यात आला होता.

४. पुण्यावरून आलेल्या 28 वर्षीय दुर्गापूर येथील युवक होम कॉरेन्टाइन होता. 21 ला लक्षणे दिसल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल झाला होता. 22 मे रोजी या युवकाचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते.
या चारही युवकांचे स्वॅब नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या १९ पैकी १८ रुग्ण चंद्रपूरमध्ये आहेत. पाहिला रूग्ण कोरोनामुक्त झाला आहे.
चंद्रपूरमध्ये २ मे ( एक रुग्ण ), १३ मे ( एक रूग्ण) २० मे ( एकूण १० रूग्ण ) आणि २३ मे ( एकूण ७ रूग्ण ) या चार तारखांना आतापर्यंत १९ रुग्ण पॉझिटीव्ह ठरले आहेत
Candrapūra jil'hyātīla kōrōnā pŏjhiṭivha rugṇān̄cī saṅkhyā 19 vara candrapūra | candrapūra jil'hyāmadhyē kōrōnā pŏjhiṭivha rugṇān̄cī saṅkhyā ātā ēkūṇa 19 jhālī āhē. 23 Mē rōjīcyā rātrī uśirā āṇakhī cāra ahavāla pŏjhiṭivha ālē āhēta. Tyāmuḷē 23 mē rōjī rātrī 15 paryanta pōhōcalēlī pŏjhiṭivha rugṇān̄cī saṅkhyā madhyarātrī nantara vāḍhūna 19 jhālī āhē. Jil'hā śalya cikitsaka nivr̥ttī rāṭhōḍa yānnī dilēlyā māhitīnusāra 23 mē cyā rātrī uśirā nāgapūra yēthūna prāpta ahavālāmadhyē cāra pŏjhiṭivha rugṇa āḍhaḷūna ālē āhēta. Yāpaikī dōna rugṇa vaidyakīya mahāvidyālaya rugṇālayāta āhēta. Tara dōna rugṇa sansthātmaka alagīkaraṇa kakṣāta āhēta. 1. Yāmadhyē mumba'īvarūna ālēlā maujā varavaṭa yēthīla pan̄cavīsa varṣācyā yuvakān̄cā samāvēśa āhē. Hā yuvaka 17 mē rōjī an'ya sahā lōkānsōbata mumba'īvarūna candrapūra yēthē ālā hōtā. Yā yuvakālā sansthātmaka alagīkaraṇa kakṣāta ṭhēvaṇyāta ālē hōtē. 22 Mē rōjī svĕba namunā ghēṇyāta ālā hōtā. 2. Ghugusa yēthīla pan̄cavīsa varṣīya mahilā 14 mē rōjī puṇyāvarūna ālī hōtī. Tī hōma kŏrannṭā'ina hōtī. Lakṣaṇē disūna ālyāmuḷē 22 mē rōjī vaidyakīya mahāvidyālaya rugṇālayāta dākhala jhālī. 22 Rōjī yā mahilēcē svĕba namunē ghēṇyāta ālē hōtē. 3. Nāśika mālēgāva yēthūna ālēlyā rugṇān̄cyā samparkātīla mūla tālukyātīla cirōlī yēthīla 27 varṣīya vyaktīlā sansthātmaka alagīkaraṇa kakṣāta ṭhēvaṇyāta ālē hōtē. Yā yuvakācā svaba namunā 22 mē rōjī ghēṇyāta ālā hōtā. 4. Puṇyāvarūna ālēlyā 28 varṣīya durgāpūra yēthīla yuvaka hōma kŏrēnṭā'ina hōtā. 21 Lā lakṣaṇē disalyāmuḷē vaidyakīya mahāvidyālaya rugṇālayāta dākhala jhālā hōtā. 22 Mē rōjī yā yuvakācē svĕba namunē ghēṇyāta ālē hōtē. Yā cārahī yuvakān̄cē svĕba namunē pŏjhiṭīvha ālē āhēta. Sadhyā 19 paikī 18 rugṇa candrapūramadhyē āhēta. Pāhilā rūgṇa kōrōnāmukta jhālā āhē. Candrapūramadhyē 2 mē (ēka rugṇa), 13 mē (ēka rūgṇa) 20 mē (ēkūṇa 10 rūgṇa) āṇi 23 mē (ēkūṇa 7 rūgṇa) yā cāra tārakhānnā ātāparyanta 19 rugṇa pŏjhiṭīvha ṭharalē āhēta

Post a Comment

0 Comments