गोंडवाना विद्यापीठाच्या सर्व अंतिम वर्षाच्या परीक्षा 16 जून पासून सुरु : वेळापत्रक जारी #gondwana-university-exam-to-start-from-16-junगोंडवाना विद्यापीठाच्या सर्व अंतिम वर्षाच्या परीक्षा 16 जून पासून सुरु : वेळापत्रक जारी Gondwana-university-exam-to-start-from-16-jun

गडचिरोली 

कोरोनाच्या टाळेबंदीमुळे गोंडवाना विद्यापीठाच्या रखडलेल्या  सर्व पदविका, पदवीपूर्व व पदव्युत्तर अंतिम परीक्षा 16 जून ते 31 जुलै या कालावधीत घेण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

त्यामुळे 15 ऑगस्टपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल लावण्यात येणार आहेत. शैक्षणिक वर्षे 2020-21 प्रथम वर्ष 1 सप्टेंबर आणि इतर सर्व अभ्यासक्रमासाठी 1 ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा व शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी कुलगुरूंनी 10 सदस्यीय समन्वय समिती गठित केली होती. 

या समितीने धोरणात्मक निर्णय घेवून परीक्षा 16 जून ते 31 जुलै या कालावधीत घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोन, तीन, चार व पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचीच परीक्षा घेतली जाणार आहे. उच्च शिक्षण संचालक पुणे यांच्या पत्रानुसार गोंडवाना विद्यापीठाने नियमित विद्यार्थ्यांची उन्हाळी सत्र 2020 ची परीक्षा घेण्यात येणार नसून विद्यार्थ्यांना 50 टक्के ग्रेड अंतर्गत मूल्यमापनावर व 50 टक्के गुण मागील सत्रातील परिक्षेच्या सरासरी गुणावरून ठरवल्या जाणार आहेत. तशा प्रकारच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत.अंतर्गत मूल्यमापनाचे गुण हे विषयाचे निरंतर मूल्यमापन, सत्र पूर्वपरीक्षा व सत्रात परीक्षा या आधारावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे महाविद्यालयाने घेतलेल्या परिक्षेच्या उत्तरपत्रिका व निरंतर मूल्यमापनाच्या राबविलेल्या प्रक्रियेचे सर्व दस्तावेज सीलबंद करून जतन ठेवावे लागणार आहे. विद्यापीठाने मागणी केल्यानंतर सदर दस्तावेज विद्यापीठास द्यावे लागणार आहे. लॉकडाऊन कालावधी ‘उपस्थिती’ म्हणून ग्राह्य होणार असून जे विद्यार्थी पुढील सत्राच्या प्रवेशापासून वंचित झाले असतील व शैक्षणिक सत्र 2019-20 मध्ये नियमित प्रवेश नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांना कॅरी फॉरवर्ड पद्धतीने शैक्षणिक सत्र 2020-19 मध्ये प्रवेशासाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. ही सुविधा फक्त विद्यमान शैक्षणिक वर्षासाठीच आहे. ज्या विद्यार्थ्यांची उपस्थिती 75 टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा सर्वांकरिता लॉकडाऊन कालावधी हा उपस्थिती म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.

15 जुलैपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्यात येईल : 

विद्यापीठाद्वारे आयोजित परीक्षा विद्यापीठाच्या अभ्याक्रमावरच आधारीत राहील. आचार्य व एमफील विद्यार्थ्यांची मौखिक चाचणी परीक्षा व्हीडीओ कॉन्फन्सिंद्वारे होईल. आचार्य व एमफिल विद्यार्थ्यांना त्यांचे शोधप्रबंध, प्रबंधिका 31 डिसेंबर 2020 पर्यंत सादर करावा लागणार आहे. महाविद्यालय तात्पुरत्या स्वरूपात 15 जूनपासून सुरू होतील. सर्व उपक्रमांच्या पूर्वतयारीचा कालावधी 30 जूनपर्यंत असेल. पदविका, पदवीपूर्व व पदव्युत्तर अंतिम परीक्षा वगळून सर्व परिक्षांचे निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर होणार आहेत.


विद्यापीठाद्वारे दिलेले गुण एखाद्या विद्यार्थ्याला मान्य नसल्यास अशा विद्यार्थ्याला प्राप्त श्रेणीमध्ये सुधारणा करावयाची असल्यास हिवाळी 2020 परिक्षेमध्ये परीक्षा आवेदनपत्र भरून परीक्षा देता येईल. त्या परिक्षेत प्राप्त गुण अंतिम समजण्यात येईल, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अनिल चिताडे यांनी दिली.All final year examinations of Gondwana University start from 16th June: Schedule issued Gondwana-university-exam-to-start-from-16-jun
Gadchiroli
The Gondwana University has announced a schedule for all the diploma, undergraduate and postgraduate final examinations from June 16 to July 31 due to Corona's lockout. Therefore, the results of all the examinations will be released by August 15. The decision to start the academic year 2020-21 from September 1 for the first year and all other courses from August 1 The Vice-Chancellor had constituted a 10-member coordinating committee to start the university examinations and academic year.

The committee has taken a strategic decision and decided to conduct the examination from June 16 to July 31. The final year examination of two, three, four and five year courses will be conducted. According to a letter from the Director of Higher Education, Pune, Gondwana University will not conduct regular summer examinations for students in the summer session 2020. Students will be judged on 50 per cent grade assessment and 50 per cent marks on the basis of average marks in the previous session. Such marks will be given to the students.The marks of internal assessment will be taken on the basis of continuous assessment of the subject, pre-examination of the session and examination in the session. Therefore, the answer scripts of the examinations conducted by the college and all the documents of the continuous assessment process will have to be sealed and preserved. The document will have to be given to the university after the demand of the university.The lockdown period will be treated as ‘attendance’ and all students who have been denied admission to the next session and are not regular admissions in the academic session 2019-20 will be eligible for admission in the academic session 2020-19 on a carry forward basis. This facility is for current academic year only. For students whose attendance is less than 75%, the lockdown period will be considered as attendance.

All results will be announced by July 15:

The examination conducted by the university will be based on the curriculum of the university. The oral test of Acharya and MPhil students will be conducted through video conferencing. Acharya and MPhil students will have to submit their dissertation, dissertation by 31st December 2020. Colleges will start on a temporary basis from June 15. The preparatory period for all activities will be till June 30. The results of all the examinations except Diploma, Undergraduate and Postgraduate will be announced by July 15.


If the marks given by the university are not acceptable to a student, if such student wants to improve the grade obtained, he / she can appear in the Winter 2020 examination by filling up the examination application form. The marks obtained in that examination will be considered final, informed the Director of Gondwana University's Board of Examinations and Assessment, Dr. Presented by Anil Chitade.

Post a Comment

0 Comments